Categories: करमाळा

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 12 व्या मुळव्याध संबंधी शिबिराची यशस्वी सांगता

 

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून आज रविवार दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी मुळव्याध संबंधीच्या आजाराविषयी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिराचे आयोजन मुळव्याध आजारासंबंधी महाराष्ट्र राज्यामध्ये नामांकित असलेले डॉ श्री प्रदीप तुपेरे साहेब व त्यांचे समवेत असलेले नामांकित डॉक्टर व त्यांची टीम यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित शिबिराचे आयोजन केले होते सदर शिबिरामध्ये 67 रूग्णांनी सहभाग नोंदवला मुळव्याध संबंधीच्या आजाराविषयी विविध तपासण्या करून काही ऑपरेटिव्ह असणाऱ्या नागरिकांचे ऑपरेशन करण्यात आले या सर्व सुविधा नाममात्र दरामध्ये या शिबिरामध्ये देण्यात आल्या जाधव -पाटील हॉस्पिटलचे सर्वेसर्वा असणारे डॉ रोहन पाटील यांच्या आई कमला भवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित केले होते सदर शिबिरामध्ये 67 रुग्णांनी तपासणी करून घेतली त्यासाठी जाधव -पाटील हॉस्पिटल मधील त्यांचे डॉक्टर्स व संबंधित कर्मचारी यांनी सहकार्य करून नागरिकांना उत्तम अशी सेवा देण्यात आली जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये इथून पुढेही करमाळा तालुक्यातील नागरिकांसाठी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या रोगासंबंधीच्या शिबिरांचे आयोजन करण्याचा मानस असल्याचे नमूद केले शिबीर यशस्वी होण्यासाठी सचिव श्री अभिजित पाटील, डॉ शिवानी पाटील, श्री अजिंक्य पाटील, श्री तात्यासाहेब जाधव, श्री महादेव भोसले, श्री प्रमोद जगदाळे, त्याचबरोबर श्री राहूल जाधव ,श्री शितल पेटकर यांनी सहकार्य केले

त्याचबरोबर आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक, आरोग्य विषय व शैक्षणिक सेवा देण्याचे कार्य या संस्थेच्या माध्यमातून केले जाईल याचा लाभ तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना होईल असे डॉ रोहन पाटील यांनी सांगितले

saptahikpawanputra

Recent Posts

इंटरनेट सेवा देण्याच्या नावाखाली केबल साठीचे नियमबाह्य खोदकाम जीवावर बेतले: अ‍ॅड बालाजी इंगळे गंभीर जखमी ! ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची सतीश निळ यांची मागणी.

करमाळा प्रतिनिधी इंटरनेट केबल टाकण्यासाठी मुंबई येथील एका खासगी कंपनीकडून करमाळा तालुक्यात नियमबाह्य व बेकायदेशीर…

5 hours ago

करमाळ्यातील एकलव्य आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसाठी बंक बेडची व्यवस्था

करमाळा / प्रतिनिधी करमाळा, येथील एकलव्य प्राथमिक आश्रमशाळेत निवासी विद्यार्थ्यांसाठी बंक बेडची व्यवस्था करण्यात आली…

7 hours ago

करमाळ्यात हनुमान चालीसा पठणाचे 151 आठवडे पूर्ण; भक्तीचा अभूतपूर्व जल्लोष

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात सुरू असलेल्या हनुमान चालीसा पठण उपक्रमाने सलग 151 आठवड्यांचा टप्पा यशस्वीरित्या…

12 hours ago

दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.रामदास झोळ सर वाढदिवस विशेष लेख – श्रीकांत साखरे

आदरणीय प्रा. रामदास झोळ सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!काही माणसं आयुष्यात फक्त भेटत नाहीत… तर आयुष्य…

2 days ago

शासकीय दाखले देण्यासाठी प्रत्येक विद्यालयात कॅम्प घ्या – गणेश चिवटे यांची मागणी

  करमाळा (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी होणारी गैरसोय…

3 days ago

करमाळा तालुक्यात मतदार यादी अचूक करण्यासाठी SIR मॅपिंग मोहिमेला वेग; तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांचे नागरिकांना सक्रिय सहभागासाठी आवाहन

करमाळा प्रतिनिधी. करमाळा विधानसभा मतदारसंघात सखोल मतदार पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रम अंतर्गत मतदार यादी अचूक करण्यासाठी…

3 days ago