Categories: करमाळा

हिसरे पंचायत समिती गणात भरत भाऊ आवताडे आघाडीवर; विकासकामांच्या जोरावर जनतेच्या पाठबळाने विजय निश्चित

करमाळा प्रतिनिधी :
हिसरे पंचायत समिती गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तसेच महायुतीचे उमेदवार उद्योजक भरत भाऊ आवताडे यांनी निवडणूक प्रचारात स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. तिसरे येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा व कर्तबगारीच्या जोरावर यशस्वी उद्योजक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारे भरत भाऊ आवताडे सध्या समाजकारण व राजकारणात सक्रिय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवत असलेल्या आवताडे यांना सर्वसामान्य नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून त्यांच्या विजयाची चर्चा जोर धरू लागली आहे.
माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे निकटवर्तीय व समर्थक म्हणून ओळख असलेल्या भरत भाऊ आवताडे यांनी गेल्या अनेक वर्षांत हिसरे पंचायत समिती गणामध्ये विविध विकासकामांच्या माध्यमातून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. करमाळा तालुक्यात भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती झाल्यानंतर माजी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप, भाजप नेत्या रश्मी दिदी बागल, युवा नेते दिग्विजय बागल तसेच मार्गदर्शक विलासराव घुमरे सर यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांना गती देण्यात आली आहे.
हिसरे पंचायत समिती गणामध्ये दहिगाव येथून पाणीपुरवठा योजना राबवून परिसर सुजलाम–सुफलाम करण्यात आली आहे. पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोना महामारीच्या काळातही भरत भाऊ आवताडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांना मास्क, सॅनिटायझर व किराणा साहित्याचे वाटप केले. या संकटाच्या काळात अनेक गरजू कुटुंबांना मदत करून आधार देण्याचे कार्य त्यांनी केले. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय उपलब्ध करून देत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
नागरिकांच्या वैयक्तिक अडचणी असोत अथवा प्रशासकीय प्रश्न, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, न्यायालय, दवाखाना आदी ठिकाणच्या कामांसाठी सहकार्य करून समस्या सोडवण्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. लग्नकार्य, आजारपण, आपत्ती अशा सर्व प्रसंगी नागरिकांच्या पाठीशी उभे राहणारा नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
या सातत्यपूर्ण जनसंपर्कामुळे व विकासकामांच्या पाठबळावर भरत भाऊ आवताडे यांना ‘आपल्या हक्काचा माणूस’ अशी ओळख मिळाली असून हिसरे पंचायत समिती गणामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
दरम्यान, हिसरे गणातील प्रलंबित प्रश्न सोडवून सर्वांगीण विकास साधण्यासाठी घड्याळ चिन्हावर मतदान करून सेवेची संधी द्यावी, असे आवाहन उमेदवार भरत भाऊ आवताडे यांनी मतदारांना केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

15 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

18 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

20 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago