Categories: करमाळा

महायुतीचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य निवडून द्या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलू – पालकमंत्री जयकुमार गोरे

 

करमाळा प्रतिनिधी – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वीट जिल्हा परिषद गटामध्ये मौजे- वीट या ठिकाणी जाहीर प्रचार सभा संपन्न झाली, या प्रचार सभेमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मतदारांना आव्हान केले की तुम्ही भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या या तालुक्यात विकासापासून वंचित राहिलेल्या सर्व गावांना आम्ही ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी देऊ व तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून दाखवू असे आव्हान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उपस्थित नागरिकांना केले,
या सभेसाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर , भाजपा महिला आघाडीच्या रश्मीदिदी बागल, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे , युवा नेते दिग्विजय बागल, विलासराव घुमरे, यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व सर्व उमेदवार उपस्थित होते,
या सभेसाठी वीट जिल्हा परिषद गटातील हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शवत मोठी गर्दी केली होती,
पालकमंत्री गोरे यांच्या सभेने वीट जिल्हा परिषद गट व तालुक्यात गणेश चिवटे यांच्या नावाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे,

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

13 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

17 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

18 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago