राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी व यशवंत परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन डॉ. विट्ठल पवार व डॉ. दयानंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे प्रत्येक सक्षम व्यक्तीने नियमित रक्तदान करावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. मिलिंद फंड हे होते. प्रमुख उपस्थितीत मा. ॲड. विक्रांत घुमरे व मा. श्री. आशुतोष घुमरे हे होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाची जबाबदारी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिमन्यू माने यांनी समर्थपणे पार पाडली. कनिष्ठ विभागाचे प्रशासकीय अधिकारी प्रा. संभाजी किर्दाक यांचीही उपस्थिती लाभली.
शिबिराची सुरुवात प्राचार्य डॉ. अभिमन्यू माने यांनी स्वतः रक्तदान करून केली. त्यामुळे उपस्थित युवक व नागरिकांमध्ये रक्तदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले. या शिबिरात विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी तसेच घुमरे सरांवर प्रेम करणारे समाजातील विविध स्तरांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
‘रक्तदान हेच जीवनदान’ हा संदेश या शिबिरातून प्रभावीपणे देण्यात आला. वाढदिवसासारखा वैयक्तिक आनंदाचा दिवस समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करण्याचा आदर्श या उपक्रमातून घालून देण्यात आल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी रक्तदाते, स्वयंसेवक, वैद्यकीय पथक तसेच आयोजनात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले. भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…