करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील मुथा नॉलेज फाउंडेशनने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. दि. २५ जानेवारी रोजी पार पडलेल्या ऑनलाईन आंतरराष्ट्रीय गणित स्पर्धेत संस्थेच्या २५ विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत सात मिनिटांत १०० गणिते अचूक सोडवणे हे आव्हान देण्यात आले होते. मात्र मुथा नॉलेज फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी अवघ्या चार ते पाच मिनिटांतच सर्व गणिते अचूक सोडवून वेग, अचूकता आणि बौद्धिक क्षमतेचा उत्कृष्ट नमुना सादर केला.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्यासह देश-विदेशातील २५ देशांमधून सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. इतक्या मोठ्या स्पर्धेत करमाळ्यातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश विशेष उल्लेखनीय ठरत आहे.
स्पर्धेच्या निकालात मुथा नॉलेज फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी विविध रँक पटकावत संस्थेच्या यशाची परंपरा कायम राखली.
फर्स्ट रँक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये श्रावणी महेश गवळी, आहिल असिफ बागवान, शर्वरी रोहित शिंदे, सानवी मनोज गंगे आणि शिवांजय उमेश सावंत यांचा समावेश आहे.
सेकंड रँक साई सागर काळे, आर्यन तात्यासाहेब जाधव, अनुष्का ब्रह्मदेव नलवडे, नेत्राली गणेश शिरसकर व अनन्या उमेश फंड यांनी मिळवला.
थर्ड रँक आदिती नवनाथ खरात, देवांशी संदीप शिंदे व राजवीर प्रमोद पोळ यांनी पटकावला, तर फोर्थ रँक समर्थ योगेश सूर्यवंशी याने मिळवला.
याशिवाय रिदम भूपेंद्र बोराडे, योजस केतन गांधी व शिवराज अमोल ढवळे यांना शायनिंग स्टार अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. तसेच शौर्य संभाजी शिंदे, मयंक महेश गवळी, शिवेंद्र शैलेश गरड, कृष्णा गणेश माळी आणि सिद्दीक अब्दुल गणी बागवान यांना प्रोडिगी अवॉर्ड प्रदान करण्यात आला.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीमुळे ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही माध्यमांतून श्रीलंकेत होणाऱ्या पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी मुथा नॉलेज फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
या सर्व यशामागे संस्थेच्या संस्थापिका ज्योती मुथा यांचे मार्गदर्शन, तसेच सहशिक्षिका स्मिता वनारसे, राणी सावंत, गौरी गवळी व दिपाली भोईटे यांचे सातत्यपूर्ण प्रशिक्षण व मेहनत कारणीभूत ठरली असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे करमाळा तालुक्याचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल झाले आहे.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…