सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू आहे.विधानसभा निवडणूक व त्यानंतर झालेल्या आदिनाथ कारखाना आणि नगरपरिषद निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये बिघाडी निर्माण झाल्यामुळे त्याचा फायदा महाविकास आघाडीने घेतला आणि त्यांनी विजय संपादन केला. या उलट जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये परिस्थिती निर्माण झाली असून भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती झाल्यामुळे महायुतीची ताकत करमाळा तालुक्यामध्ये सध्या वाढलेली आहे.
त्यातच महाविकास आघाडीचे तुकडे होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून काही उमेदवार निवडणूक रिंगणात मध्ये उतरले आहेत तर काही उमेदवारांनी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे. महाविकास आघाडी मधील माजी आमदार आमदार जयवंतराव जगताप यांनी नारायण पाटील यांना सहकार्य करून आमदार करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली होती त्या जगताप भाऊंनीही महायुतीला पाठिंबा दिलेला आहे व स्वतः ते प्रचाराच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. यामुळे करमाळा तालुक्यात इतिहास घडणार असून ९ तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व १८ उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा सुजित बागल यांनी केला आहे.
चौकट…
आदिनाथ सहकारी साखर कारखान्यांमधून सोन्याचा धूर काढू असे दिलेले आश्वासन हवेत विरल्यामुळे सभासदांचा विश्वासघात झालेला आहे .दीड वर्ष आमदारकीला पूर्ण होऊनही दीड रुपयाचाही निधी मतदार संघामध्ये आलेला नाही यामुळे सर्वसामान्य मतदारांचा विश्वासघात झालेला आहे. ज्यांच्या पाठिंब्यामुळे आमदारकी मिळाली त्याच नेतृत्वाला झिडकारल्यामुळे विद्यमान आमदारांची प्रतिमा मलीन झालेली आहे याचा परिणाम येत्या निवडणुकीत निश्चितच दिसणार आहे.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…