Categories: करमाळा

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोफत तिरुपती बालाजी देवदर्शनाचा प्रेरणादायी उपक्रम करमाळा तालुक्यातील रावगावचे सुपुत्र लक्ष्मण बुधवंत यांचा पुढाकार; सलग बाराव्या वर्षी यशस्वी आयोजन

करमाळा प्रतिनिधी :
करमाळा तालुक्यातील रावगाव येथील सुपुत्र लक्ष्मण बुधवंत यांच्या संकल्पनेतून आणि हैदराबाद येथील सामाजिक कार्यकर्ते वेणू कुमारजी चुक्ला यांच्या सहकार्याने दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत तिरुपती बालाजी देवदर्शन घडवून आणणारा एक अनोखा, प्रेरणादायी व सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम यंदाही यशस्वीरीत्या पार पडला.
श्री अष्टोदरा शता: १०८ चुक्ला चॅरिटेबल ट्रस्ट, हैदराबाद आणि वेणू व्यंकटेशा चॅरिटेबल ट्रस्ट, रावगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आंध्र प्रदेशातील पिरमलु येथील १०८ दिव्यांग विद्यार्थ्यांची श्री तिरुपती बालाजी देवदर्शन यात्रा भक्तिभावपूर्ण वातावरणात आणि काटेकोर नियोजनात संपन्न झाली.
हा उपक्रम केवळ यंदाच मर्यादित नसून, गेल्या सलग बारा वर्षांपासून लक्ष्मण बुधवंत यांच्या पुढाकारातून दिव्यांग विद्यार्थ्यांना तिरुपती बालाजी देवदर्शनाचा लाभ देण्यात येत आहे. “दरवर्षी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद, समाधान आणि भक्तीभाव पाहिल्यावर खऱ्या अर्थाने ईश्वरसेवा केल्याचे समाधान मिळते,” अशी भावना लक्ष्मण बुधवंत यांनी व्यक्त केली.
या पवित्र यात्रेदरम्यान दिव्यांग विद्यार्थ्यांना तिरुमला येथील श्री वेंकटेश्वर (बालाजी) भगवानाचे मनोभावे दर्शन घडले. दर्शनावेळी “गोविंदा गोविंदा”, “जय बालाजी जय जय बालाजी” या जयघोषांनी संपूर्ण तिरुमला परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद पाहून उपस्थित भाविकही भावूक झाले.
या यात्रेच्या आयोजनात प्रवास, निवास, भोजन तसेच देवदर्शनाची संपूर्ण व्यवस्था अत्यंत काळजीपूर्वक आणि शिस्तबद्धरीत्या करण्यात आली होती. यात्रेप्रसंगी चुक्ला चॅरिटेबल ट्रस्टचे सर्वेसर्वा वेणू कुमारजी चुक्ला, लक्ष्मण बुधवंत, डॉ. योगेश पाटील यांच्यासह ट्रस्टचे कर्मचारी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) चे अध्यक्ष, सर्व ट्रस्टी व कर्मचारी वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना कोणताही अडथळा न येता सुरक्षित आणि सुलभ देवदर्शनाचा लाभ मिळाला.
दिव्यांगांच्या जीवनात आत्मिक समाधान, सकारात्मकता आणि आत्मविश्वास निर्माण करणारा हा उपक्रम केवळ धार्मिक नसून सामाजिक संवेदनशीलतेचे उत्तम उदाहरण ठरत आहे. चुक्ला चॅरिटेबल ट्रस्ट आणि वेणू व्यंकटेशा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या या स्तुत्य कार्याबद्दल समाजातील विविध स्तरांतून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago