Categories: करमाळा

करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी शांततेत मतदान निवडणूक निरीक्षक अरुण आनंदकर यांची श्रीदेवीचा माळ येथील मतदान केंद्रास भेट

करमाळा प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समिती करमाळा सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत तालुक्यातील मतदान प्रक्रिया मंगळवारी सर्वत्र शांततेत व सुरळीतपणे पार पडत असल्याचे चित्र दिसून आले. सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून नागरिक मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडताना दिसत आहेत.
करमाळा येथील श्रीदेवीचा माळ येथील मतदान केंद्रास निवडणूक निरीक्षक तथा अप्पर जिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कारंडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार माढा संजय भोसले बाल विकास अधिकारी सूर्यवंशी साहेब विनोद जवणे उपस्थित होते.
अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रावरील मूलभूत सुविधा, सुरक्षा व्यवस्था, मतदान यंत्रणा तसेच कर्मचारी वर्गाच्या कामकाजाची सविस्तर पाहणी केली. मतदान प्रक्रिया शांततेत व नियमांनुसार सुरू असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध असून मतदान यंत्रणा सुरळीत कार्यरत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
यावेळी निवडणूक निरीक्षक अरुण आनंदकर यांनी मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देताना सांगितले की,
“आपले एक मत देशाचे भवितव्य घडवू शकते. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने आपला हक्क बजावत १०० टक्के मतदान करावे.”
दरम्यान, करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसून सर्व मतदान केंद्रांवर शांततेत मतदान सुरू असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कारंडे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय भोसले यांनी दिली.
करमाळा तालुक्यातील विविध मतदान केंद्रांवर प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दीड वाजेपर्यंत 31 टक्के मतदान झाले असून पोलीस प्रशासनासह संबंधित यंत्रणा सतर्क असून मतदारांनी निर्भयपणे मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
लोकशाहीचा हा उत्सव अधिक आनंदात आणि उत्साहात साजरा व्हावा, यासाठी अनेक मतदान केंद्रांबाहेर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तसेच केंद्र परिसरात रंगीबेरंगी फुगे लावण्यात आले होते. नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने “संकल्प आमचा – शंभर टक्के मतदान”, “आपले एक मत देशाचे भविष्य घडवू शकते”, “यावेळी १००% मतदान” अशा आकर्षक संदेशांचे फलक तसेच सेल्फी पॉईंट उभारण्यात आले होते. यामुळे विशेषतः तरुण मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
एकूणच करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासनाच्या चोख नियोजनामुळे आणि नागरिकांच्या सकारात्मक सहभागामुळे मतदान प्रक्रिया शांततेत, सुरळीत आणि लोकशाही मूल्ये जपत पार पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago