Categories: करमाळा

३५ वर्षांच्या सेवेला सन्मानाचा सलाम करमाळ्यात प्रथमच सफाई कामगाराचा वाढदिवस सार्वजनिकरित्या साजरा नगरसेवक सचिन गायकवाड यांच्या उपक्रमातून समाजाला नवा संदेश

करमाळा प्रतिनिधी दिनेश मडके 
करमाळा शहरात तब्बल ३५ वर्षांपासून अविरतपणे स्वच्छतेची सेवा बजावणारे सफाई कामगार सुनील मामा खरात यांचा वाढदिवस प्रथमच सार्वजनिक पातळीवर साजरा करण्यात आला. करमाळा नगरपरिषदेचे नूतन नगरसेवक सचिन गायकवाड यांच्या पुढाकारातून हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला असून, या कृतीने समाजासमोर एक सकारात्मक आणि प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.
सकाळपासून संध्याकाळपर्यंत शहर स्वच्छ ठेवण्यासाठी झटणाऱ्या सफाई कामगारांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. काही वेळा त्यांच्याशी उभे राहणेही समाजातील काही घटक टाळतात. मात्र हेच कामगार शहराच्या आरोग्याचे खरे शिल्पकार आहेत, या भावनेतून नगरसेवक सचिन गायकवाड यांनी हा उपक्रम हाती घेतला. सफाई कामगारांनाही सन्मान, आपुलकी आणि माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
वंचित आणि दुर्लक्षित घटकांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलावा, तसेच प्रत्येक श्रमाला सन्मान मिळायलाच हवा, हा संदेश या वाढदिवस सोहळ्याच्या माध्यमातून देण्यात आला. साधेपणाने, पण आत्मीयतेने साजऱ्या करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सुनील मामा खरात यांना केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमास करमाळा शहराचे उपनगराध्यक्ष अतुल भैया फंड, नगरसेवक प्रशांत ढाळे, अमोल आबा यादव यांच्यासह मोठ्या संख्येने सफाई कामगार बांधव उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सुनील मामा खरात यांच्या दीर्घ सेवेला सलाम करत त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
हा उपक्रम केवळ वाढदिवस साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता, समाजातील प्रत्येक घटक समान आहे आणि प्रत्येक श्रमाला सन्मान मिळायलाच हवा, हा महत्त्वाचा संदेश देणारा ठरला आहे. करमाळा शहरात सुरू झालेला हा अभिनव उपक्रम इतर नगरसेवक, संस्था आणि नागरिकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago