Categories: करमाळा

केतुर गणात ॲड अजित विघ्ने यांचा विजय सामाजिक न्याय राज्यमंत्री स्वर्गीय दिगंबरराव बागल मामांच्या आठवणींना उजाळा देत हलगीच्या तालावर जल्लोष

.            करमाळा प्रतिनिधी:
करमाळा तालुक्यातील केतुर पंचायत समिती गणातून एडवोकेट अजित विघ्ने यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. विजयाची घोषणा होताच स्वर्गीय दिगंबरराव बागल मामा यांच्या बंगल्यावर जाऊन कार्यकर्त्यांसह हलगी वाजवून पारंपरिक पद्धतीने जल्लोष साजरा करण्यात आला. या आनंदोत्सवामुळे परिसरात उत्साहाचे आणि नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले.
एडवोकेट अजित विघ्णे हे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले, चळवळीतील कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. स्वर्गीय दिगंबरराव बागल मामा यांच्या काळात त्यांनी विलासराव घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली निष्ठेने कार्यकर्ते म्हणून काम केले. त्याचबरोबर माजी आमदार जयवंतराव जगताप यांचेही ते कार्यकर्ते राहिले असून राजकीय अनुभवाची मजबूत शिदोरी त्यांच्या पाठीशी आहे.
करमाळा तालुक्यात यावेळी भाजप नेत्या रश्मी बागल आणि माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप–राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती करण्यात आली होती. या युतीला माजी आमदार जयवंतराव जगताप यांची खंबीर साथ लाभली. संजय मामा शिंदे गटाचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने एडवोकेट अजित विघ्णे यांनी महायुतीतून निवडणूक लढवली आणि सुमारे अडीच हजार मताधिक्याने विजय संपादन केला.
संघर्षातून उभे राहिलेले नेतृत्व म्हणून एडवोकेट अजित विघ्णे यांची करमाळा तालुक्यात ओळख आहे. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने झटणारा कार्यकर्ता अशी त्यांची प्रतिमा आहे. माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांना संधी देत पंचायत समितीच्या रिंगणात उतरवले आणि ताकद दिली, असे मत राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
आपल्या विजयाबद्दल प्रतिक्रिया देताना एडवोकेट अजित विघ्णे म्हणाले की, “या यशामध्ये माजी आमदार संजय मामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप, रश्मी दीदी बागल तसेच युवा नेते दिग्विजय बागल ,सौ. सवितादेवी राजेभोसले, श्री. सुभाष आबा गुळवे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच हा विजय शक्य झाला.”
स्वर्गीय दिगंबरराव बागल मामा हे विजयाच्या आनंदात हलगी वाजवून उत्सव साजरा करण्यासाठी प्रसिद्ध होते. त्याच परंपरेला उजाळा देत, मामांचे जुने कार्यकर्ते या नात्याने एडवोकेट अजित विघ्णे यांनी हलगीच्या तालावर आनंदोत्सव साजरा केला. या जल्लोषामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून आगामी काळात पंचायत समितीतून विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago