Categories: करमाळा

विलासराव घुमरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळ्यात भाजप–राष्ट्रवादीला ऐतिहासिक यश

करमाळा प्रतिनिधी 
करमाळा तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने घवघवीत यश मिळवत तालुक्याच्या राजकारणात आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या यशामागे माजी आमदार विलासराव घुमरे यांचे अचूक मार्गदर्शन, नियोजनबद्ध रणनीती आणि कार्यकर्त्यांमध्ये साधलेला समन्वय निर्णायक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी दीदी बागल, माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तसेच माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या खंबीर साथीमुळे आघाडीला हे यश मिळाले असले, तरी संपूर्ण निवडणूक यंत्रणेचे सूत्रधार म्हणून विलासराव घुमरे यांची भूमिका महत्त्वाची ठरली. प्रचाराचे नियोजन, उमेदवार निवड, बूथनिहाय बांधणी आणि कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावणे या सर्व बाबींमध्ये घुमरे यांनी प्रभावी कामगिरी बजावली.
विरोधकांवर टीका करण्यापेक्षा विकासकामांचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत सकारात्मक प्रचारावर भर देण्यात आला. नव्या कार्यकर्त्यांना संधी देत अनुभवी कार्यकर्त्यांचा योग्य वापर करण्याचे धोरण राबवण्यात आले. परिणामी, मतदारांमध्ये विश्वास निर्माण झाला आणि त्याचे प्रतिबिंब निकालात स्पष्टपणे दिसून आले.
राजकारणात सुसंस्कृती जपत सर्व घटकांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका घुमरे यांनी कायम जपली आहे. आपल्या सहकाऱ्यांना पुढे आणणे, त्यांचे नेतृत्व घडवणे आणि संघटन मजबूत करणे हीच त्यांची ओळख असून, याच भूमिकेमुळे ते करमाळा तालुक्याचे किंगमेकर म्हणून ओळखले जातात.
या निकालामुळे आगामी राजकीय समीकरणांमध्ये भाजप–राष्ट्रवादी आघाडी अधिक मजबूत झाली असून, करमाळा तालुक्यात आघाडीचा झेंडा फडकत राहील, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

3 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago