Categories: करमाळा

रावगाव परिसरातील वीजेच्या प्रश्नावर आमदार नारायण आबा पाटील यांनी जिल्हा नियोजन बैठकीत उठवला आवाज

 

करमाळा प्रतिनिधी सोलापूर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत करमाळा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील वीजेच्या प्रश्नाबाबत आक्रमक भूमिका घेतली व सदर‌ बैठकीत रावगाव येथील ३३/११ केव्हीए क्षमतेचे सबस्टेशन व‌ सध्या या परिसरात शेतीसाठी दिला जाणारा खंडीत आणि अपुरा वीज पुरवठा यावर आवाज उठवला. याबाबत अधिक माहिती देताना आमदार नारायण आबा पाटील सांगितले की रावगाव आणि परिसरातील शेतीपंपाचा वीज प्रश्न कायमचा सुटला जावा म्हणुन आपण सन २०१६ मध्ये आमदार असताना ३३/११ केव्हीए क्षमतेचे एक नवीन वीज केंद्र मंजूर करुन‌ घेतले. या नियोजित मंजुर सबस्टेशनची उभारणी लवकर सुरू व्हावी यासाठी वेळोवेळी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. परंतू त्यावेळी काही विरोधकांनी जागेचा प्रश्न‌ निर्माण केला. याचीही सोडवणुक करत आपण यासाठी नवीन जागा उपलब्ध करुन दिली. जागेचे करारपत्र करत असताना संबंधित व्यक्ती हयात राहीली नाही. अशा अनेक अडचणी येत असताना सत्तांतर झाले व मागील पाच वर्षे हा प्रश्न तसाच रेंगाळत राहिला. परत एकदा आपण २०२४ मध्ये आमदार पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर महावितरणची आढावा बैठक घेतली व रावगाव येथील सबस्टेशनची उभारणी लवकरात लवकर पुर्ण करा अशा सुचनाही दिल्या. यानंतर काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आपण हा प्रश्न मांडला असुन महावितरणच्या अधिकाऱ्यांना याबाबत धारेवर धरले. रावगाव परिसरातील शेतकऱ्यांसाठी हे सबस्टेशन लवकर उभारण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या रावगाव व करमाळा तालुक्यातील इतर काही ठिकाणी शेती पंपासाठी रात्रपाळीत लाईट दिली जात आहे. वास्तविक पाहता संपुर्ण राज्यात शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा केला जात असताना व सरकारच्या महावितरणला तशा सुचना असताना रावगाव परिसरात रात्री वीजपुरवठा केला जात आहे. तसेच करमाळा तालुक्यातील अनेक ठीकाणी क्षमतावाढ करुनही शेतीसाठी कमी दाबाने वीज पुरवठा केला जातोय. यामुळे वीजेची कमतरता भासुन सतत वीज खंडीत होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. यामुळे याचा परिणाम रब्बीच्या पिकांवर‌ होत असल्याने महावितरण कडून करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना पुर्ण दाबाने व अखंडीत वीज पुरवठा दिला जावा अशी मागणी कालच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago