Categories: करमाळा

करमाळा शहर हद्दवाढीची भाजप नगरसेविका सौ. स्वाती महादेव फंड यांची मागणी; व्होटकर पुल–श्रीदेवीचामाळ रस्ता नगरपरिषदेकडे देण्याचा प्रस्ताव*

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहराची हद्दवाढ करून शहरालगत विकसित झालेल्या ग्रामीण भागाचा नगरपरिषदेच्या हद्दीत समावेश करावा, तसेच डॉ. व्होटकर पुल ते श्रीदेवीचामाळ रस्ता नगरपरिषदेकडे हस्तांतरित करून मध्यभागी डिवायडर व स्ट्रीट लाईटची व्यवस्था करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका सौ. स्वाती महादेव फंड यांनी नगराध्यक्षा मुख्याधिकारी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, करमाळा शहरालगतच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंग होऊन सुमारे एक ते दीड किलोमीटर परिसरात नागरी वस्ती निर्माण झाली आहे. अनेक घरे व बंगले उभारले गेले असले तरी हा भाग शहर हद्दीबाहेर असल्याने नागरिकांना गटारी, पाणीपुरवठा, रस्ते, वीज आदी मूलभूत नागरी सुविधा नियमितपणे उपलब्ध होत नाहीत. परिणामी रहिवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सदर ग्रामीण भागाचा शहर हद्दीत समावेश केल्यास नागरिकांना आवश्यक नागरी सुविधा पुरविणे शक्य होईल. तसेच नगरपरिषदेच्या कररचनेतून महसुलात वाढ होऊन शहराच्या विकासालाही चालना मिळेल, असे फंड यांनी निवेदनात म्हटले आहे. या संदर्भात नगरपरिषदेकडून ठराव मंजूर करून शासनस्तरावर प्रस्ताव पाठविण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, करमाळ्याचे आराध्य दैवत श्री कमलाभवानी मंदिर ते शहर हद्दीतील डॉ. व्होटकर पुल या दरम्यानचा रस्ता सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे. हा रस्ता नगरपरिषदेकडे हस्तांतरित करून मध्यभागी डिवायडर उभारावा तसेच स्ट्रीट लाईटचे पोल बसवावेत, अशीही मागणी सौ. स्वाती महादेव फंड यांनी केली आहे. मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ लक्षात घेता सुरक्षित व सुसज्ज रस्ता आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
वरील दोन्ही विषय नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर घेऊन त्यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका सौ. स्वाती महादेव फंड सामाजिक कार्यकर्ते महादेव आण्णा फंड यांनी केली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा माध्यमिक शिक्षक संघटना टिडीएफच्यावतीने शिक्षक नेते पुणे विभागीय उपाध्यक्ष मुकुंद साळुंखे सर यांच्या हस्ते सत्कार*

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी तात्यासाहेब जाधव, व्हाईस चेअरमनपदी निशांत खारगे…

5 hours ago

सोलापूर जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल शंभूराजे जगताप यांचा टीडीएफतर्फे गौरव टीडीएफचे पुणे विभागीय उपाध्यक्ष मुकुंद साळुंखे सर यांच्या हस्ते सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शंभूराजे जयवंतराव जगताप यांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी…

2 days ago

सांगोल्यातील डॉ.धनाजी जगताप व डॉ.सारिका जगताप यांच्या गोदावरी हॉस्पिटलमध्ये लहान मुलांवर मोफत शस्त्रक्रिया व मोफत औषध उपचार

सांगोला प्रतिनिधी सांगोला शहरातील प्रसिद्ध असलेल्या डॉ. धनाजी जगताप व डॉ. सारिका जगताप यांच्या हॉटेल…

2 days ago

करमाळ्याच्या मातीतील रंगांचा दिल्लीच्या क्षितिजावर आविष्कार… चित्रकार निवास कन्हेरे यांचे ‘Prismatic Resonances’ चित्रप्रदर्शन; २३ नोव्हेंबरपासून राजधानीत कलात्मक पर्वणी

  करमाळा  प्रतिनिधी ग्रामीण मातीतील संवेदना, मानवी भावविश्व आणि सर्जनशीलतेला आपल्या कुंचल्यातून वैश्विक ओळख मिळवून…

2 days ago

करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी तात्यासाहेब जाधव यांची बिनविरोध निवड व्हा. चेअरमनपदी निशांत खारगे, तर सचिवपदी अजित कणसे यांची निवड

  करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. तात्यासाहेब जाधव यांची, तर…

3 days ago