करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाचे गणित विषयाचे सेवानिवृत्त शिक्षक स्व. अर्जुन (तात्या) ज्योतीराम फंड सर यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच करमाळा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
स्व. अर्जुन तात्या फंड सर हे अत्यंत मनमिळाऊ, प्रेमळ व साध्या स्वभावाचे होते. ‘तात्या’ या नावाने ते परिसरात सर्वपरिचित होते. विद्यार्थ्यांचे आवडते सर म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी आयुष्यभर साधेपणा, कष्ट आणि मूल्यांवर आधारित जीवन जगले.
अत्यंत खडतर परिस्थितीतून त्यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. कष्टाच्या जोरावर पाचही मुलांना उत्तम शिक्षण देऊन त्यांना सक्षम घडविले. त्यांच्या संस्कारांचा ठसा कुटुंबियांच्या यशात दिसून येतो. दोन मुलांचे अकाली निधन झाले तरी त्यांनी त्या दुःखावर खंबीरपणे मात करून कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.त्यांचावर शुक्रवार, दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी , विकासनगर १२ बंगल्याच्या पाठीमागे हिंदू स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले .त्यांच्या अंत्यसंस्काराला शैक्षणिक सामाजिक राजकीय विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.
करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…
करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…
करमाळा प्रतिनिधी उजनी धरणावर प्रस्तावित तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प, एआय डेटा…
करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…
करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…