करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे सेवानिवृत्त आदर्श गणित शिक्षक स्व. अर्जुन तात्या फंड सर यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने फंड परिवारासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
स्व. फंड सर हे साधेपणा, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी यांसाठी ओळखले जात होते. शिक्षक म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा दिली. त्यांच्या विचारांचा व संस्कारांचा ठसा असंख्य विद्यार्थ्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या जीवनावर उमटला आहे. त्यांच्या जाण्याने समाजातील एक ज्येष्ठ व आदरणीय व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
या दुःखद प्रसंगी यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांनी फंड कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन व्यक्त केले. तसेच यशवंतराव महाविद्यालयाच्या वतीनेही त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची प्राचार्य डॉक्टर अभिमन्यू माने उपप्राचार्य डॉक्टर अनिल साळुंखे प्रशासन अधिकारी संभाजी किर्दाक सर प्राध्यापक रााख जाधव सर यशवंत परिवारातील सदस्य, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशी प्रार्थना करण्यात आली.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…