Categories: करमाळा

जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना; १ मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होणार-पृथ्वीराज पाटील

करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. आमदार नारायण आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जेऊरचे लोकनियुक्त सरपंच पृथ्वीराज भैय्या पाटील यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली.
यावेळी पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली. अध्यक्षपदी उमेश कांडेकर यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी योगेश कर्णवर व राकेश गरड यांची निवड झाली. मिरवणूक प्रमुख म्हणून विनोद गरड तर सह मिरवणूक प्रमुख म्हणून सागर भगत यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. सचिवपदी धनंजय घोरपडे, सहसचिवपदी आनंद मोरे यांची निवड झाली. खजिनदार म्हणून सुयोग दोशी तर सहखजिनदार म्हणून सागर बादल यांची निवड करण्यात आली. उत्सव प्रमुख म्हणून जमीर शेख, तुषार किरवे, उमेश मोहिते यांची निवड झाली असून सह उत्सव प्रमुख म्हणून हिंदूराज निर्मळ व यश जाधव यांची निवड झाली.
समिती स्थापनेच्या बैठकीस पंचायत समिती सदस्य धनु भाऊ शिरस्कर, राजू शेठ गदिया, माजी सरपंच राजू जगताप, माजी उपसरपंच मुबारक शेख, परमेश्वर पाटील, महेश कांडेकर, ब्रह्मदेव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सरपंच पृथ्वीराज भैय्या पाटील यांनी करमाळा तालुक्यातील सर्व शिवप्रेमी बांधवांना आवाहन केले की, रविवार दिनांक १ मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन त्यांनी केले.जेऊर परिसरात शिवजयंती उत्सवाची तयारी सुरू झाली असून गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 hours ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

17 hours ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

19 hours ago

करमाळा पोलिसांचा दणका ट्रॅक्टर चोरीचा छडा; ३.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वीट येथील शेतातून ट्रॅक्टर लंपास; तांत्रिक तपासातून दोघे ताब्यात

करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…

1 day ago

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

  करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…

3 days ago