Categories: करमाळा

करमाळ्यात श्री खोलेश्वर महादेवाच्या नंदीची 20 फेब्रुवारीला भव्य मिरवणूक

करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा शहरातील ग्रामदैवत श्री खोलेश्वर महादेव मंदिर येथे दरवर्षी आयोजित होणारा नंदी उत्सव यंदाही भक्तिपूर्ण वातावरणात साजरा केला जाणार आहे. सालाबादानुसार, मित्ती फाल्गुन शु. तृतीया, शुक्रवार दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.५५ वाजता श्री खोलेश्वर महादेवाच्या नंदीची भव्य मिरवणूक खांद्यावरून निघणार आहे
श्री खोलेश्वर आरती मंडळ व नंदी उत्सव समिती, करमाळा यांच्या वतीने उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव, पुजारी, मानकरी आणि सर्व सभासदांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू आहे. समितीने मार्गदर्शनाची संपूर्ण व्यवस्था केली असून, भक्तांसाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत.
भक्तिमय वातावरणात ढोल-ताशांचा गजर, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि “हर हर महादेव”च्या जयघोषात मिरवणूक शहरातील
किल्ला वेस वेताळ पेठ फुलसौंदर चौक जय महाराष्ट्र चौक गुजर गल्ली छत्रपती चौक दत्त पेठ सुभाष चौक राशिन पेठ डॉ.आंबेडकर पुतळा गायकवाड चौक → किल्ला विभाग महादेव मंदिरमार्गक्रमणानंतर उपस्थित भक्तांसाठी महाप्रसादचे आयोजन समितीच्यावतीने करण्यात आले असून मंडळाच्या वतीने सर्व भाविकांना मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समितीने विशेषतः शहरातील सर्व शिवभक्तांना हा उत्सव अनुभवण्याचे निमंत्रण दिले आहे.शहरातील प्रत्येक घटक – धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक – या उत्सवात सहभागी होऊन करमाळा शहरातील ऐतिहासिक व भक्तिपूर्ण परंपरेला उजाळा देण्याची संधी लाभणार आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago