कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या विकास मंडळाचे सचिव मा. श्री. विलासरावजी घुमरे (सर) होते. प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव, प्रसिद्ध कवी व वक्ते डॉ. शिवाजी नारायणराव शिंदे उपस्थित होते.
प्रकाशन प्रसंगी सुप्रसिद्ध कवी तथा शब्दशिवार प्रकाशनचे प्रकाशक मा. इंद्रजीत घुले, सुप्रसिद्ध लेखक डॉ. राजेंद्र दास, सुप्रसिद्ध कवी मा. सुरेश शिंदे, संस्थेचे विश्वस्त चंद्रशेखर शिलवंत सर, मा. श्री. अजयकुमार भोसलेसाहेब, सिमरन भोसले, डॉ. अश्विन अंबी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अभिमन्यू माने कनिष्ठ विभागाचे प्रशासन अधिकारी श्री. संभाजी किर्दाक यांच्यासह कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या मनोगतात डॉ. शिवाजी नारायणराव शिंदे यांनी साहित्य हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगून अब्बा बरोबर आहेत या पुस्तकातील विचारप्रवाह समाजमनाला दिशा देणारा असल्याचे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात मा. विलासरावजी घुमरे यांनी अशा साहित्यनिर्मितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती वृद्धिंगत होते, असे मत व्यक्त केले.
लेखिका डॉ. सौ. केसरजहाँ यांनी आपल्या लेखनप्रक्रियेविषयी सांगताना पुस्तकामागील प्रेरणा आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली. उपस्थित मान्यवरांनी पुस्तकाचे कौतुक करत लेखिकेला पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मुक्ता काटवटे , सुत्रसंचालन प्रा. विष्णू शिंदे, आभार सिमरन भोसले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शंभूराजे जयवंतराव जगताप यांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी…
करमाळा प्रतिनिधी उजनी धरण परिसरात प्रस्तावित असलेल्या AI डेटा सेंटर आणि विविध ऊर्जा प्रकल्पांविरोधात युवक…
सांगोला प्रतिनिधी सांगोला शहरातील प्रसिद्ध असलेल्या डॉ. धनाजी जगताप व डॉ. सारिका जगताप यांच्या हॉटेल…
करमाळा प्रतिनिधी ग्रामीण मातीतील संवेदना, मानवी भावविश्व आणि सर्जनशीलतेला आपल्या कुंचल्यातून वैश्विक ओळख मिळवून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. तात्यासाहेब जाधव यांची, तर…
करमाळा (प्रतिनिधी): सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील श्री कमलाभवानी देवीच्या मंदिरात…