Categories: करमाळा

श्रीमान भाऊसाहेब झाडबुके इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूलमध्ये ‘आनंद बाजार’ उत्साहात साजरा

करमाळा  प्रतिनिधी
करमाळा येथील श्रीमान भाऊसाहेब झाडबुके इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूलमध्ये ‘आनंद बाजार’ हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या व्यवहारज्ञानास चालना देणाऱ्या या उपक्रमास पालक व मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
संस्थेच्या संचालिका मा. सौ. वर्षाताई ठोंबरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती करमाळा येथील विषय साधन व्यक्ती मा. श्री आदलिंगे सर, झाडबुके महाविद्यालयाचे प्राचार्य मा. श्री ढवळे सर तसेच जेष्ठ पालकवर्ग यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी उपस्थितांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
‘शिकता-शिकता कमवा’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत विविध प्रकारची फळे, पालेभाज्या, मिठाई, घरगुती खाद्यपदार्थ तसेच इतर वस्तू विक्रीसाठी आणल्या होत्या. विद्यार्थ्यांनी आकर्षक पद्धतीने स्टॉल उभारून वस्तूंची मांडणी केली होती. पालकांनी विद्यार्थ्यांकडून वस्तू खरेदी करून त्यांना प्रोत्साहन दिले.
या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना चलनांची ओळख, पैशांचा व्यवहार, नफा-तोटा यांसारख्या संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून समजावून देण्यात आल्या. तसेच पालेभाज्यांचे पोषणमूल्य आणि आरोग्यदायी आहाराचे महत्त्व यांची जाणीव करून देण्यात आली.
बार्शी शाखेतील टेक्नीकूल हायस्कूलचे शिक्षक मा. श्री अमोल बारकुल सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका मा. सौ. सोनाली पवार मॅडम, मेघा कांबळे मॅडम, चव्हाण मॅडम, आहेर मॅडम, ठोसर मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि पालकांचा उत्साह यामुळे ‘आनंद बाजार’ हा उपक्रम संस्मरणीय ठरला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago