करमाळा पोलीस ठाणे हद्दीत दाखल चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास करत पोलिसांनी सुमारे 2 लाख 10 हजार रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करून न्यायालयाच्या आदेशानुसार फिर्यादीस परत दिला. या कारवाईमुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
गुन्हा क्रमांक 788/2024 भा. न्या. संहिता कलम 305(अ) अन्वये दाखल असलेल्या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी संशयित आरोपी रामेश्वर जंगल्या भोसले (रा. पांडेगव्हाण, ता. आष्टी, जि. बीड) यास ताब्यात घेतले. सखोल चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली देत चोरी केलेला सोन्याचा मुद्देमाल स्वतःच्या ताब्यात असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी 7 ग्रॅम वजनाची सोन्याची ठुशी व 8 ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील दोन फुले असा एकूण 2 लाख 10 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला.
सदर मुद्देमाल मा. न्यायालयाच्या आदेशानुसार फिर्यादी अभिजीत जीवन सरडे (रा. कंदर, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांना परत देण्यात आला. मुद्देमाल परत मिळाल्याने फिर्यादी यांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी (सोलापूर ग्रामीण), अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर (सोलापूर ग्रामीण) तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही. एस. (करमाळा उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या नेतृत्वाखाली API गिरीजा मस्के व पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केली.
दुसऱ्या गुन्ह्यातील सोन्याची अंगठीही परत
दरम्यान, करमाळा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 926/2025 भारतीय न्याय संहिता-2023 चे कलम 74, 75(2), 316(2) अन्वये दाखल गुन्ह्यातील मुद्देमालही परत करण्यात आला आहे. या प्रकरणातील 4 ग्रॅम 990 मिलिग्रॅम वजनाची सोन्याची पीळ्याची अंगठी मा. अतिरिक्त सत्र न्यायदंडाधिकारी, बार्शी यांच्या आदेशान्वये फिर्यादी मन्नाबी हरून शेख (रा. करमाळा, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांना सुपूर्द करण्यात आली.
पोलीस प्रशासन नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध असून गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलीस निरीक्षकांनी सांगितले.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…