Categories: करमाळा

सांगोला येथे २० फेब्रुवारी २०२६ रोजी जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा पादुका दर्शन सोहळा

करमाळा प्रतिनिधी
*अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी* (नाणीजधाम) यांच्या पवित्र पादुकांचे दर्शन सोहळा शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता सांगोला येथे आयोजित करण्यात आला आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान आणि सोलापूर जिल्हा सेवा समिती यांच्या वतीने वाढेगाव रोड रामकृष्ण गार्डन व्हिला येथे या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सोहळ्यानिमित्त सकाळी ९ वाजता शहरातून पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून त्यानंतर संतपीठावर पादुकांचे आगमन होईल. दिवसभर गुरुपूजन, प्रवचन, उपासक दीक्षा,आरती पुष्पवृष्टी व दर्शन सोहळा पार पडणार आहे. भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

संस्थानतर्फे शैक्षणिक, वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. राज्यातील विविध महामार्गांवर ५३ रुग्णवाहिका २४ तास मोफत सेवा देत असून गरजू रुग्णांना त्याचा लाभ होत आहे. तसेच सुशिक्षित बेरोजगार युवकांना वाहन प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर करण्याचे कार्य सुरू आहे.
४ जानेवारी ते १९ जानेवारी या कालावधीत राबविण्यात आलेल्या रक्तदान संकल्प अभियानात विक्रमी १ लाख ७१ हजार १५० बाटल्या रक्तसंकलन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. संकलित रक्त गरजू रुग्णांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.तसेंच पूर्ण महाराष्ट्रतआणि महाराष्ट्राच्या बाहेर ही कच्चे बंधारे तसेंच वृक्षारोपण ही केले आहे.
कार्यक्रमाच्या सोहळ्यानिमित्त सामाजिक उपक्रमांतर्गत गरजू तसेच शेतकऱ्यांसाठी २० लिटर क्षमतेचे एकूण ७५ स्प्रे (फवारणी) पंपांचे वाटप करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास सोलापूर जिल्हा निरीक्षक सचिन काकडे, जिल्हाध्यक्ष आबासाहेब शिंदे, महिला अध्यक्ष संजीवनीताई माने, युवा अध्यक्ष देवदास ननवरे, कर्नल मंजुताई बोराडे, सचिव मारुती भोसले, अध्यात्मिक प्रमुख शरद माते सर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रभाकर शितोळे, विशेष कार्यवाहक सचिव भरत राऊत, सामाजिक उपक्रम प्रमुख दत्ता बनकर यांच्यासह जिल्हा कमिटी सदस्य, सर्व तालुका अध्यक्ष, महिला अध्यक्ष, सांगोला तालुका अध्यक्षा मीनाक्षी राऊतताई, तालुका कॅप्टन अविनाश शिंदे, तसेच युवा सेना, संग्राम सेना, महिला सेना, पुरुष सेना व प्रवचनकार उपस्थित राहणार आहेत.
सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील भाविक, भक्त, शिष्य व साधक बंधू-भगिनींनी या पवित्र सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

19 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

22 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

23 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago