Categories: करमाळा

पत्रकारांच्या मुला – मुलींच्या करिअर साठी केलेल्या मदतीबद्दल मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांचा बार्शीत पत्रकारांच्या वतीने सत्कार

 

 

बार्शी प्रतिनिधी
पत्रकारांच्या कल्याणासाठी भरीव योगदान देणारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (दादा) पाटील यांचा बार्शी येथे सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. पत्रकारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी तसेच त्यांच्या आरोग्याच्या गरजांसाठी दिलेल्या आर्थिक मदतीबद्दल बार्शीतील पत्रकारांनी ग्रामदैवत भगवंताची मूर्ती भेट देऊन दादांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीचे संचालक तथा ज्येष्ठ संपादक राजा माने यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कार्याची दखल घेत, मंत्री पाटील यांनी पत्रकारांसाठी मोलाची मदत उपलब्ध करून दिली. त्यांच्या प्रेरणेने व आश्रयाने स्थापन झालेल्या ‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’च्या माध्यमातून गेल्या आठ महिन्यांत राज्यभरातील पत्रकारांना तब्बल १७ लाख रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. ही मदत पत्रकारांच्या मुलांच्या करिअर घडविण्यासाठी शैक्षणिक सहाय्य तसेच गंभीर आजारांवरील वैद्यकीय उपचारांसाठी देण्यात आली. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांचे सामाजिक व वैयक्तिक आयुष्य सुदृढ राहणे अत्यावश्यक आहे, या जाणिवेतून दादांनी पुढाकार घेतल्याचे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले.

यावेळी राज्य प्रसिद्धी प्रमुख धिरज शेळके यांनी दादांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, पत्रकारांच्या अडचणी ओळखून त्यावर तत्परतेने मदतीचा हात देणे ही दुर्मीळ बाब आहे. आर्थिक मदतीसोबतच पत्रकारांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेणारे नेतृत्व म्हणून दादांची ओळख अधिक दृढ झाली आहे. बार्शीतील या सत्कार सोहळ्याने पत्रकार बांधवांच्या एकात्मतेचा आणि कृतज्ञतेचा भाव अधोरेखित केला. पत्रकारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी उचललेले हे पाऊल राज्यातील पत्रकारांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

सत्कार प्रसंगी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत, संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, राष्ट्रीय समन्वयक मुरलीधर चव्हाण, राज्य कोषाध्यक्ष अमित इंगोले, राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष सूर्यवंशी, राज्य प्रसिद्धी प्रमुख धिरज शेळके, सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी, महिला जिल्हाध्यक्षा निता देव, तालुकाध्यक्ष सिद्धार्थ बसवंत तसेच संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि तालुक्यातील पत्रकार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

1 day ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

4 days ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

4 days ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

5 days ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

5 days ago