Categories: Uncategorized

ग्रंथभेटीतून शिवजयंतीचा संदेश हालहळ्ळीतील स्वा. सावरकर सार्वजनिक वाचनालयाचा प्रेरणादायी उपक्रम

अक्कलकोट  प्रतिनिधी: तालुक्यातील हालहळ्ळी (अ.) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ गोविंदे यांच्या कल्पकतेतून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विद्यार्थ्यांना ग्रंथभेट देत उत्साहात साजरी करण्यात आली. देशभक्ती, वाचनसंस्कृती आणि इतिहासाची जाणीव या त्रिसूत्रीवर आधारित हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रामसेविका सरवळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच प्रकाश बिराजदार होते. यावेळी पोलीस पाटील मल्लिकार्जुन बिराजदार यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन केले. ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत निरंतर वाचन केंद्रातील शालेय विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ग्रंथभेट देण्यात आली. विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकावर आपल्या बोलीभाषेत अभिप्राय लिहून तो मराठी भाषा गौरव दिनी २७ फेब्रुवारीपर्यंत शाळेच्या मुख्याध्यापकांकडे सादर करावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी नदाफ, शेख व विद्यार्थी उपस्थित होते. शेख यांनी शिवरायांच्या पराक्रमाची व स्वराज्य स्थापनेची माहिती देत विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी अभिमान जागवला. कार्यक्रमाच्या शेवटी यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

saptahikpawanputra

Recent Posts

यशवंत शिंदे यांची नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी! ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकमाढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी  निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…

1 day ago

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

1 day ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

2 days ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

1 week ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago