Categories: करमाळा

करमाळा तालुका हमाल पंचायतच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

करमाळा प्रतिनिधी
 करमाळा तालुका हमाल पंचायत व छत्रपती शिवाजी तरुण मंडळ यांच्या वतीने हमाल, तोलार, दिवाणजी, राखणदार, शेतकरी व कष्टकरी वर्गाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
करमाळा येथील हमाल भवन येथे सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन हमाल पंचायतचे अध्यक्ष ॲड. राहुल सावंत आणि नगरसेवक संजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक पै. सुनिल बापू सावंत, तुकाराम इंदलकर, हुमरान मुलाणी, संदीप कांबळे, सरपंच चंद्रकांत काळे, आजिनाथ भागडे, धनंजय शिंदे, जमीर सय्यद, आझाद शेख, मुस्तकीम पठाण देवा लोंढे, संचालक मनोज गोडसे, वालचंद रोडगे, विठ्ठल रासकर, मयूर देवी, अल्लाउद्दीन शेख  आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रतिमापूजनानंतर करमाळा शहरातून हलगी, ताशा आणि बॅन्जो यांच्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, महाराणा प्रताप, लोकमान्य टिळक यांसह इतर महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या औचित्याने त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
मिरवणुकीनंतर हमाल भवन येथे मा. भीमराव लोंढे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वाबाबत मनोगत व्यक्त केले. यावेळी करमाळा व तालुक्यातील कष्टकरी, शेतकरी, हमाल, तोलार, दिवाणजी, राखणदार व व्यापारी वर्ग उपस्थित होता. विशेष उल्लेखनीय उपस्थितीमध्ये विक्रम सिंग परदेशी, जितेश कांबळे, विनोद महानवर, अमोल शिंदे, छोटू परदेशी, अभय महाजन, संग्राम देशमुख, निलेश सावंत, भाऊसाहेब काळे, राजकुमार सुरवसे, पांडुरंग सावंत, गणेश झोळ, रामा कारंडे, विजय रोडगे सर, उमेश हवालदार, मार्तंड सुरवसे, माऊली सुरवसे, पै. गणेश सावंत, शिंगटे सर, अभय कुंभार, हविन गायकवाड, संदेश उबाळे, शेंडे भाऊसाहेब, महेश मोरे, साजिद बेग उपस्थित होते.
शिवजयंती निमित्त अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीमराव लोंढे, गजानन गावडे, सोपान बारवकर, ज्ञानदेव गोसावी, संतोष कुकडे, अंकुश ढवळे, नानासाहेब मोरे, नामदेव फरतडे, लक्ष्मण क्षीरसागर, प्रमोद गायकवाड, अनिल रासकर, किशोर ताकतोडे, शकील शेख, सचिन चांदगुडे, सतीश खंडागळे, संजय गायकवाड, पप्पू रोडगे, गणेश कांबळे, शिवाजी आवटे, दत्तात्रय धुरेकर, सुभाष शेंडगे, महादेव कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
उत्सवामुळे करमाळा शहर व तालुक्यातील विविध वर्गातील नागरिकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांबाबत जागरूकता निर्माण झाली आणि हा कार्यक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

13 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

17 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

18 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago