Categories: करमाळा

करमाळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी ५० लाखांचा निधी मंजूर करा शिवस्मारक प्रतिष्ठानची मागणी

करमाळा प्रतिनिधी
शिवस्मारक प्रतिष्ठाण यांच्या वतीने करमाळा नगर परिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा परिसराच्या सुशोभीकरणासाठी तसेच नव्या चबुतऱ्याच्या बांधकामासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, करमाळा शहरातील शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा शहराच्या वैभवाचे प्रतीक असून त्या परिसराचे सुशोभीकरण करणे गरजेचे आहे. सध्याच्या स्थितीत परिसरात सुयोग्य रचना, आकर्षक प्रकाशयोजना, हरितीकरण आणि भक्कम चबुतरा उभारण्याची आवश्यकता आहे. यासाठी ५० लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी उपनगराध्यक्ष अतुल फंड, भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे, भाजप तालुकाध्यक्ष काकासाहेब सरडे, सचिन गायकवाड, रामभाऊ ढाणे, विनय ननवरे, अरुण जगताप, प्रविण जाधव, गणेश महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना मंत्री जयकुमार गोरे यांनी, “भाजप नगरसेवकांना विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. आवश्यक त्या कामांसाठी शासनाकडून योग्य ती मदत केली जाईल,” असे अभिवचन दिले. तसेच आठवड्याभरातच ५० लाखांचा निधी देण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
दरम्यान, करमाळा शहरातील नागरिकांमध्ये या मागणीबाबत सकारात्मक वातावरण असून, लवकरच निधी येणार असून कामास सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago