यावेळी सुरेश कर्नावट, ज्येष्ठ पत्रकार ॲड. बाबुराव हिरडे, ॲड सुखलाल लुणावत,माजी नगरसेविका संगीताताई खाटेर, माजी नगराध्यक्ष अमोद संचेती, पिंटु गुगळे प्रकाश बलदोटा, संतोष बलदोटा, सतिश बलदोटा, प्रदीप लुणिया ,अमृत कटारिया, अनिल सोळंकी ,प्रकाश सोळंकी, राजेंद्र सोळंकी ,कचरूशेठ मंडलेचा ,दिलीप मंडलेचा, संजय मंडलेचा दिपक कटारिया,पत्रकार दिनेश मडके,बाळु कटारिया , रितेश कटारिया, रावसाहेब सावरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात आपल्या भाषणात तपश्री प्रतिष्ठान गुरू गणेश गणेश दिव्यरत्न गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर यांनी आब्बड दांपत्यांच्या सहजीवनाचा गौरवपूर्ण उल्लेख करताना सांगितले की, “सुख-दुःखाचा धैर्याने सामना करत समाजात आदर्शवत जीवन जगणारे आब्बड दांपत्य निश्चितच प्रेरणादायी आहे.” पुढे ते म्हणाले की, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ संसारातूनच साध्य होतात. संसारिक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत उत्तमचंद व सौ.बिजाबाई आब्बड यांनी आपल्या संततीला योग्य शिक्षण, संस्कार आणि मूल्ये देऊन सक्षम बनविले, हीच त्यांच्या आयुष्याची खरी कमाई आहे.
सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले प्रसिद्ध जैन गायक तरुण मोदी यांचा भक्तिगीतांचा बहारदार कार्यक्रम. त्यांच्या सुमधुर सादरीकरणामुळे सभागृह भक्तिमय वातावरणाने भारावून गेले.
यावेळी आब्बड दांपत्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व भेटवस्तू देत निरोगी, आनंदी व समृद्ध आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
हा सोहळा त्यांचे जावई अमोल सोळंकी, निलेश लुंकड, प्रितम कांकारिया, संदेश कर्नावट, राकेश बेदमुथ्था, संतोष चोरडिया, अजित कोचेटा तसेच मुली साधना, नुतन, भाग्यश्री, शशिकला, सुवर्णा यांनी विशेष परिश्रम घेतले. बहिण कमल तसेच पुतणे राजेश व संतोष यांनीही विशेष सहकार्य केले.
जावई व मुलींकडून आयोजित हा सुवर्णमहोत्सवी सन्मान सोहळा आब्बड दांपत्यांच्या जीवनकार्याचे सार्थक ठरला. प्रेरणादायी विचार आणि कुटुंबातील एकोप्याचे दर्शन घडविणारा हा सोहळा सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला आहे.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…