*
दिवेगव्हाण येथील शिवगर्जना दूध संकलनाचे सर्वेसर्वा ईश्वर मोरे यांच्या पुढाकारातून या अनोख्या विजय मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. सजवलेल्या हत्तीवर बसवून गणेश चिवटे यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. हलगी, बॅन्जोच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या मिरवणुकीने करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात विशेष चर्चा रंगली आहे.
मिरवणुकीनंतर विजयी सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी युवा नेते अभिषेक मोरे, निलचंद दुरंदे, भाजपाचे ज्येष्ठ नेते संजय घोरपडे, भगवान गिरी गोसावी यांनी भाषणे करत गणेश चिवटे यांच्या नेतृत्वगुणांचे व विकासाभिमुख कार्यपद्धतीचे कौतुक केले.
आपल्या मनोगतात गणेश चिवटे म्हणाले की “तालुक्यात विक्रमी मताधिक्याने विजय मिळाल्यानंतर ईश्वरकाका मोरे यांनी प्रेमापोटी काढलेली ही मिरवणूक माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. या ऋणातून उतराई होण्यासाठी वीट जिल्हा परिषद गटासह दिवेगव्हाण आणि तालुक्यातील इतर गावांच्या विकासासाठी मी अधिक ताकदीने प्रयत्न करेन.”
ते पुढे म्हणाले की, “मी जरी वीट जिल्हा परिषद गटातून विजयी झालो असलो तरी संपूर्ण तालुक्यात विकासकामे करण्याचा माझा प्रयत्न राहील.” मिरवणुकीबद्दल त्यांनी ईश्वर मोरे व दिवेगव्हाण ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानले आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले,
*चौकट*
गणेशभाऊ चिवटे यांचा विजय हा केवळ निवडणुकीचा निकाल नाही, तर विकासाच्या राजकारणावर आमचा विश्वास आहे. त्यांनी केलेल्या कामांची जाणीव ठेवूनच आम्ही त्यांचा सन्मान हत्तीवरून मिरवणूक काढून केला. हे आमच्या प्रेमाचे आणि ठाम पाठिंब्याचे प्रतीक आहे,” आयोजक – ईश्वर मोरे, दिवेगव्हाण
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…