Categories: करमाळा

दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये “सुंदर मला व्हायचंय” या विषयावर विशेष सेमिनार संपन्न

 

करमाळा प्रतिनिधी दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांसाठी आणि नागरिकांसाठी “सुंदर मला व्हायचंय” या विषया वर विशेष मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या सेमिनारसाठी भारतातील प्रख्यात त्वचारोग तज्ज्ञ डॉ. नितीन ढेपे यांना प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले.

डॉ. नितीन ढेपे हे भारतातील अग्रगण्य स्किन स्पेशालिस्ट असून त्यांनी त्वचारोग आणि सौंदर्यविषयक उपचार क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. अनेक आधुनिक आणि अत्याधुनिक स्किन ट्रीटमेंट्स भारतात प्रथमच सुरू करण्याचा मान त्यांना मिळाला आहे. त्वचेचे आरोग्य, सौंदर्यवर्धन, लेझर ट्रीटमेंट, अँटी-एजिंग उपचार आणि विविध कॉस्मेटिक प्रक्रियांमध्ये त्यांचा मोठा अनुभव आहे.

या सेमिनारमध्ये त्वचेची योग्य निगा कशी राखावी, बदलत्या जीवनशैलीचा त्वचेवर होणारा परिणाम, तसेच सुरक्षित आणि प्रभावी उपचारपद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन करत असताना डॉ. नितीन ढेपे यांनी सांगितले कि, आजच्या काळात प्रत्येकालाच सुंदर दिसण्याची इच्छा असते. मात्र, केवळ चेहऱ्याचे सौंदर्यच नव्हे तर मनाचे सौंदर्यही तितकेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. तसेच त्यांनी नमूद केले की, खरे सौंदर्य हे आत्मविश्वास, सकारात्मक विचार आणि निरोगी जीवनशैली यांमधून खुलते.

तसेच त्यांनी लाइफस्टाइल आणि योग्य आहार (डाएट) यांचे महत्त्वही अधोरेखित केले. संतुलित आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि ताणतणाव नियंत्रण यामुळे त्वचेचे आरोग्य टिकून राहते, असे त्यांनी स्पष्ट केले. आधुनिक उपचारपद्धतींची माहिती देताना त्यांनी सुरक्षित आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच उपचार घेण्याचा सल्ला दिला.
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास मधुकर झोळ तसेच सचिवा सौ. माया रामदास झोळ उपस्थित होते. त्यांनी प्रमुख वक्त्यांचा सत्कार करून विद्यार्थ्यांना अशा मार्गदर्शनपर कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
संस्थेच्या वतीने सांगण्यात आले की, या कार्यक्रमाचा उद्देश तरुणांमध्ये त्वचेच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि योग्य माहिती उपलब्ध करून देणे हा आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

17 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

20 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

22 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago