“फार्मास्युटिकल, लाईफ अँड फॉरेन्सिक सायन्सेसमधील नवकल्पना : शास्त्रीय ज्ञानाचा आधुनिक तंत्रज्ञानाशी संगम” हा परिषदेचा मुख्य विषय असून औषधनिर्मिती क्षेत्रातील अत्याधुनिक संशोधन, नवतंत्रज्ञानाचा वापर, तसेच फॉरेन्सिक सायन्समधील बदलते प्रवाह यावर सखोल चर्चा होणार आहे. संशोधनपर शोधनिबंध सादरीकरण, तज्ज्ञांची मार्गदर्शक व्याख्याने, तसेच उद्योग-शिक्षण क्षेत्रातील समन्वय यावर विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
संस्थेच्या सचिव श्रीमती माया झोळ यांनी सांगितले की, या परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्गदर्शन मिळावे आणि संशोधनाची नवी दारे खुली व्हावीत, हा प्रमुख उद्देश आहे. संस्थापक-अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनीही परिषदेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील संशोधन व नवकल्पनांची ओळख होईल, असा विश्वास व्यक्त केला.
परिषदेच्या उद्घाटनासाठी मान्यवर प्रमुख पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले असून त्यांच्या मार्गदर्शनामुळे तरुण संशोधकांना प्रेरणा मिळणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत विविध तांत्रिक सत्रे, पोस्टर प्रेझेंटेशन व चर्चासत्रांचा समावेश असणार आहे.
भिगवण परिसरातील शैक्षणिक क्षेत्रासाठी ही परिषद एक महत्त्वपूर्ण घटना ठरणार असून औषधनिर्मिती व संबंधित विज्ञान शाखांमध्ये कार्यरत असलेल्या संशोधकांसाठी हा एक उत्तम व्यासपीठ ठरणार आहे.
करमाळा प्रतिनिधी निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…
करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…
करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…