Categories: करमाळा

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पश्‍चिम महाराष्ट्र सह संपर्कप्रमुख पदी सतीशभाऊ सावंत यांची निवड शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना 24 तास मदत करणार – सतीशभाऊ  सावंत

सांगोला प्रतिनिधी –
शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या पश्‍चिम महाराष्ट्राच्या सह संपर्क प्रमुख पदी गोरगरिब रूग्णांना 24 तास मदत करणारे सतीशभाऊ सावंत यांची निवड करण्यात आल्याची घोषणा राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे ओएसडी व शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश चिवटे यांनी करून त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या पंढरपूर विभागाचे प्रमुख असताना सतीशभाऊ सावंत यांनी रुग्णांना अविरतपणे मदत केली महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून अनेक गरजू रुग्णांना भरीव मदत केली अनेक रुग्णांच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या अनेक हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना भेटून बिलामध्ये सवलती देण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अनेक रुग्ण आर्थिक मदत करून अनेक रुग्णांचे प्राण वाचवले याची गंभीर दखल घेऊन राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्व खाली हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या तथा डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या पश्‍चिम महाराष्ट्र सह संपर्कप्रमुख पदी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश चिवटे यांनी निवड केली आहे.
 या पत्रामध्ये शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या माध्यमातून गोरगरीब गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात 10 % राखीव खाटा उपलब्ध करून देणे निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पूर्णता मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भातील मदत महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया करणे संदर्भातील मार्गदर्शन करून सदैव तत्पर राहावे तसेच गंभीर व  महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या गोरगरीब रुग्णांना भरीव प्रमाणात आर्थिक सहाय्य व्हावे याकरिता पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट, सर रतन टाटा ट्रस्ट यासारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी थेट बाळासाहेब भवन येथील मुख्य कार्यालयात संपर्क साधावा असेही पत्रात संस्थापक अध्यक्ष व कार्याध्यक्ष रामहरी राऊत यांनी नमूद केले आहे निवडी नंतर सतीश भाऊ सावंत यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
चौकट-
 सतीशजी सावंत यांचे गोरगरिबांसाठी मोठे काम आहे जनतेसाठी अहोरात्र काम करणारा माणूस म्हणून दोन वेळा मतदारांनी त्यांच्या वर विश्‍वास टाकून निवडून दिले राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली सतीशजी सावंत यांनी वैद्यकीय मदत कक्षा चे काम अतिशय चांगल्या प्रकारे करून गोरगरिबी रुग्णांना मदत करतील त्यांना शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कक्षाने त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना पश्‍चिम महाराष्ट्राचे सहसंपर्क पदावर नेमणुक केली आहे.
– मंगेश चिवटे ओएसडी

चौकट-
 शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे पश्‍चिम महाराष्ट्र सह संपर्कप्रमुख म्हणून राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब खासदार श्रीकांत शिंदे ओएसडी मंगेश चिवटे यांनी माझ्यावर जो विश्‍वास टाकून मला रुग्णांची सेवा करण्याची संधी दिली टाकलेल्या विश्‍वासास मी कायमच पात्र राहणार आहे या शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या माध्यमातून रुग्णांना 24 तास मदत करून त्यांचे प्राण वाचवण्यासाठी कटिबद्ध आहे लवकरच शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या सांगोला तहसील कार्यालयासमोरील संपर्क कार्यालयात रुग्णांच्या मदतीसाठी 24 तास उपलब्ध राहुन रूग्णंना मदत करणार आहे.
– सतीशभाऊ सावंत
– सह संपर्कप्रमुख पश्‍चिम महाराष्ट्र शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष

saptahikpawanputra

Recent Posts

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी अभिव्यक्तीला जिल्हास्तरीय व्यासपीठ* *लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ करमाळ्यात उद्या वक्तृत्व स्पर्धा

करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…

12 hours ago

मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी मंडळाच्या शिबीरात १६६ जणांचे रक्तदान*

करमाळा प्रतिनिधी - मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने…

1 day ago

जयकुमार गोरे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा करमाळ्यात भाजपकडून तीव्र निषेध

  करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.…

2 days ago

नाशवंत गोष्टीकडे दुर्लक्ष करून शाश्वत गोष्टी लक्षात घेवून युवकांनी समाजकारण व राजकारणातून जनतेची सेवा करावी . – मा .आ जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी दिग्वीजय बागल यांची ' मूख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ता समिती च्या करमाळा विधानसभा…

2 days ago

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त करमाळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

  करमाळा प्रतिनिधी : मुक्ता साळवे शैक्षणिक अभियान, करमाळा यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे…

2 days ago

शासकीय कामकाजाचे प्रत्यक्ष धडे! ‘नामसाधना’च्या चिमुकल्यांनी स्वतः अर्ज लिहून मांडल्या समस्या; मुख्याधिकाऱ्यांकडून कौतुक

करमाळा (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना लहानपणापासूनच दैनंदिन जीवन, प्रशासकीय कामकाज, शासकीय…

4 days ago