Categories: करमाळा

श्रीराम प्रतिष्ठानच्यावतीने करमाळा येथे १० मे २०२६ रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा- गणेश चिवटे

करमाळा प्रतिनिधी : श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी देखील सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून हा सोहळा दि. १० मे २०२६ , रविवारी रोजी सायंकाळी गोरज मुहूर्तावर करमाळा येथे संपन्न होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चिवटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना चिवटे म्हणाले की, प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला जातो. मात्र यावर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे कार्यक्रमाची तारीख बदलून १० मे २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे. यावर्षीचा विवाह सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार असून महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तालुक्यातील नागरिकांनी आपल्या वधू- वरांची नावे या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी नोंदवावीत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
गेल्या चार वर्षांपासून श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत असून मागील तीन वर्षांत सुमारे शंभर वधू- वरांचे विवाह यशस्वीरीत्या लावण्यात आल्याची माहिती चिवटे यांनी दिली. यावर्षी अधिकाधिक विवाह पार पाडण्याचा मानस असून प्रत्येक वधू-वरांना सर्व आवश्यक सुख-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींसाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे.
यंदाच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात नव वधू- वरांची आकर्षक अशी आगळीवेगळी मिरवणूक काढण्यात येणार आहे , वऱ्हाडी मंडळींसाठी दिवसभर स्वतंत्र जेवण व्यवस्थाही करण्यात येणार असल्याचे चिवटे यांनी सांगितले.
सर्वांच्या स्मरणात राहील असा भव्य व दिमाखदार विवाह सोहळा आयोजित करण्यासाठी प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व पदाधिकारी कामाला लागले असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago