पवार जनरल हॉस्पिटल करमाळा यांच्यावतीने डॉ. अविनाश राऊत यांच्या मोफत अस्थिरोग व डॉ. सौ. श्वेता राऊत यांच्या दंतचिकित्सा शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील पवार जनरल हॉस्पिटल यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत अस्थिरोग व दंतचिकित्सा तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहरासह तालुक्यातील अनेक रुग्णांनी शिबिरात उपस्थित राहून तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली.
अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश राऊत (M.B.B.S., D.Ortho) यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १०० रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. यामध्ये हाडांचे फ्रॅक्चर, संधिवात, मान व कंबर दुखी, नसांचे विकार, हात-पाय दुखणे, मुंग्या येणे तसेच स्नायू व सांध्यांचे विविध आजार यांसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. अनेक रुग्णांना पुढील उपचारांसाठी आवश्यक सल्लाही देण्यात आला.
दंतशल्य चिकित्सक डॉ. सौ. श्वेता राऊत (देवकर) (B.D.S.) यांनी सुमारे ५० रुग्णांची तपासणी करून रूट कॅनल, दात काढणे, दात बसविणे (कवळी), हिरड्यांचे आजार, दातांमध्ये फिलिंग तसेच मशीनद्वारे दात स्वच्छ करणे आदी उपचारांबाबत मार्गदर्शन केले. अत्याधुनिक दंत उपकरणांच्या सहाय्याने तपासणी करण्यात आल्याने रुग्णांनी समाधान व्यक्त केले.
हॉस्पिटलमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या अपघात (Accident) उपचार सेवा व अत्याधुनिक दंतचिकित्सा विभागाबाबतही नागरिकांना माहिती देण्यात आली.
यावेळी हॉस्पिटलचे संचालक डॉ. रविकिरण ज्ञानदेव पवार यांनी सांगितले की, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश राऊत व दंतचिकित्सक डॉ. सौ. श्वेता राऊत हे आता पूर्ण वेळ पवार जनरल हॉस्पिटल, करमाळा येथे रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध राहणार आहेत. नागरिकांनी या तज्ज्ञ सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या उपक्रमामुळे करमाळा शहर व परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून भविष्यातही अशा सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

19 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago