Categories: करमाळा

देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवान नवनाथ गात स्मृती पुरस्कारांची घोषणा २ मार्च रोजी करमाळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार सन्मान

करमाळा : प्रतिनिधी
देशाच्या रक्षणासाठी प्राणार्पण करणारे शहीद जवान नवनाथ गात यांच्या २३ व्या स्मृतीदिनानिमित्त दिले जाणारे ‘शहीद जवान नवनाथ गात स्मृती पुरस्कार’ यंदा विविध क्षेत्रातील पाच मान्यवर व संस्थांना जाहीर करण्यात आले आहेत. स्मारक समितीचे अध्यक्ष नागनाथ गात व सचिव नीलकंठ ताकमोगे यांनी ही माहिती दिली.
गेल्या २२ वर्षांपासून शहीद जवान नवनाथ गात यांच्या स्मृती जपण्यासाठी तसेच समाज व राष्ट्रहितासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्याचा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत व्यक्तींना प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे समितीने स्पष्ट केले.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान
यावर्षी सामाजिक क्षेत्रात अनिल दौंडे (उपजिल्हाधिकारी, पुणे) यांची निवड करण्यात आली आहे. शौर्य क्षेत्रात शौर्य पदक विजेते निवृत्त कॅप्टन रावसाहेब साळुंखे यांना गौरविण्यात येणार आहे.
शैक्षणिक क्षेत्रात जि.प. प्राथमिक शाळा आदलिंग वस्ती कोंढज या शाळेची निवड झाली आहे. क्रीडा क्षेत्रात कुमार महाराष्ट्र केसरी किताब पटकावणारे शिवम आण्णासाहेब ढाणे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रात सेंद्रिय शेतीचा प्रसार करणाऱ्या करमाळा ऑरगॅनिक ग्रुप यांचा गौरव होणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळा सोमवार, २ मार्च २०२६ रोजी मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे.
रक्तदान शिबिर व कीर्तन
स्मृतीदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. गणेश महाराज बरगे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमास आमदार नारायण पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा, तहसीलदार शिल्पा ठोकडे, ग्राम सुधार समिती अध्यक्ष ॲड. बाबुराव हिरडे, भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा सौ रश्मी दिदी बागल-कोलते, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.रामदास झोळ, योगेश दळवे, आण्णासाहेब ढाणे, मनोज राऊत, अक्रूर शिंदे, कॅप्टन विलास नाईकनवरे, अजित तळेकर, देविदास ताकमोगे, महादेव जाधव, सुनील सावंत यांच्यासह आजी-माजी सैनिक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमास पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शहीद जवान नवनाथ गात स्मारक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

3 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago