Categories: करमाळा

करमाळ्याच्या समृद्धी साडेकरची सैनिक शाळेत थेट झेप३०० पैकी २४० गुणांची दणदणीत कामगिरी

करमाळा प्रतिनिधी : करमाळा तालुक्यातील समृद्धी अविनाश साडेकर हिने अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा मध्ये उज्ज्वल यश संपादन करत ३०० पैकी तब्बल २४० गुण मिळवले आहेत. या दणदणीत कामगिरीमुळे सैनिक शाळा मध्ये पुढील शिक्षणासाठी तिची निवड निश्चित झाली आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण करमाळा तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.
स्पर्धात्मक आणि आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत समृद्धीने उच्च गुणवत्तेची कामगिरी नोंदवत स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातून येत असूनही तिने कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर हे यश मिळवले. मर्यादित साधनसुविधांमध्येही मोठे स्वप्न पाहून ते साकार करण्याची तिची जिद्द कौतुकास्पद ठरली आहे.
या यशामागे तिच्या शिक्षिका व मार्गदर्शक स्वाती सुनील पवार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. योग्य नियोजन, नियमित सराव आणि मानसिक तयारी यामुळेच उत्कृष्ट गुण मिळवता आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वडील अविनाश साडेकर आणि आई रंजना साडेकर यांनी दिलेले सातत्यपूर्ण प्रोत्साहन, सकारात्मक वातावरण आणि अभ्यासासाठी केलेली साथ यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना समृद्धीने व्यक्त केली.
समृद्धीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सुवर्णाकार समाजाचे अध्यक्ष अष्टभुजा ज्वेलर्स च मालक मनोज  बुराडे यांनीही तिचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत .करमाळा तालुक्यातील विविध क्षेत्रांतून तिचे अभिनंदन होत आहे. तिची ही कामगिरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, जिद्द आणि योग्य दिशादर्शनाच्या जोरावर कोणतीही उंची गाठता येते, हा संदेश तिच्या यशातून अधोरेखित झाला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

11 hours ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

17 hours ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

4 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

5 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

6 days ago