Categories: करमाळा

महिला दिन विशेष – रंगुनी रंगात साऱ्या – डॉ.सुनिता दोशी

रंगुनी रंगात साऱ्या….

यंदा रंगपंचमी आणि महिला दिन एकाच दिवशी आला आहे…! आहे ना एक अपूर्व योगायोग…! काय संदेश मिळतो यातून…?

रंगपंचमीला आपण अनेक रंगात रंगतो….सरते शेवटी सर्व रंग काढल्यावर दिसतं ते आपलं रूप….! आपलं खरं रूप…!
एका स्त्रीचं आयुष्य देखील अनेक रंगात रंगलेलं असतं…! बालपणीचा अल्लड रंग… खेळायचं बागडायचं आणि शिकायचं वय…पण तेथे देखील तिच्याकडून समजूतदारपणाची संस्कारांची अपेक्षा असते समाजाची…! त्यानंतर यौवनातला गुलाबी रंग… आपलं घर सोडून जोडीदाराच्या घरी जाऊन त्या रंगात रंगून जाणारं तारुण्य… अनेक नाती समर्थपणे पेलताना प्रत्येक रंगात रंगणारं तिचं जीवन…!कधी आज्ञाधारक मुलगी… कधी प्रेमळ आई… कधी मायाळू बहीण…. कधी संस्कारी सून… तर कधी जबाबदार सासू…कधी नटखट नणंद…कधी सेवाभावी भावजय….! प्रत्येक रंग वेगळा… आणि जबाबदारी वेगळी… कर्तव्यही वेगळे… अपेक्षाही वेगळ्या….! या सर्व अपेक्षांमध्ये तिचं स्वतःचं अस्तित्व काय….? अनेक रंगात रंगलेल्या तिच्या जीवनात ती स्वतःसाठी कधी जगते…? तिचा रंग कोणता…?
रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा….हे तिला सांगायचा दिवस म्हणजे “महिला दिन…!”….तिला तिचा स्वतःचा रंग आहे…स्वतःचं अस्तिव आहे…ह्याची जाणीव करून देण्याचा आजचा दिवस….!
तिच्या जीवनातला प्रत्येक रंग जगताना तिला साथ देऊन त्या रंगांचं सप्तरंगी इंद्रधनुष्य घडविणं…आणि त्या शिवायही तिला तिच्या स्वतःच्या रंगात तिला रंगू देणं…हेच रंगपंचमीच्या रंगात रंगणाऱ्या महिला दिनाचं मागणं आहे….जे सर्वांनी पूर्ण करायचं आहे….!!!
आणि तिला गुणगुणायला लावायचं आहे…
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा…
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा….!

डॉ सुनिता दोशी ✍

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

21 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago