मनसेचे तालुकाध्यक्ष संजय (बापू) घोलप यांनी पत्रकारांशी बोलताना ही बाब जोरदारपणे उपस्थित केली. नवीन स्मार्ट मीटर बसवताना ग्राहकांना देण्यात आलेल्या आश्वासनाचा त्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले, “नवीन सिमकार्ड असलेली स्मार्ट मीटर बसवताना ग्राहकांना सांगण्यात आले होते की, आता वीज बिल वाचनासाठी मीटरजवळ जाण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे वेळेवर बिल मिळेल, एवढेच सांगण्यात आले. मात्र, बिल थकल्यास केवळ ३० दिवसांत कनेक्शन कापले जाईल, ही अट कधीच ग्राहकांना सांगण्यात आली नव्हती किंवा जाहीरही करण्यात आली नव्हती.”
श्री. घोलप यांनी या नियमाला जाचक आणि अमानवीय ठरवले. सध्याच्या महागाईच्या काळात, सरकारी कर्मचारी असो वा शेतकरी, सर्वसामान्यांची आर्थिक उलाढाल मंद गतीने होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. “अशा परिस्थितीत केवळ एका महिन्याच्या थकबाकीवर वीज कनेक्शन तोडणे म्हणजे गोरगरीबांना विजेपासून वंचित ठेवून त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे. ही अट इंग्रजांच्या काळातील जाचक कायद्यांप्रमाणे असून, नागरिकांमध्ये याबद्दल तीव्र नाराजी आहे,” असे ते म्हणाले.
मनसे तालुकाध्यक्षांनी यासंदर्भात ठोस भूमिका मांडताना मागणी केली की, “किमान एक आर्थिक वर्ष (मार्च ते मार्च) थकबाकीची मुदत द्यावी. एका महिन्याच्या थकबाकीवर कनेक्शन कट करण्याची ही अन्यायकारक अट त्वरित रद्द करावी.”
याप्रश्नी लवकरच सोलापूरचे पालकमंत्री मा. जयकुमार गोरे यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, ही मागणी मान्य न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मनसैनिक राज्यभर रस्त्यावर उतरतील, असा इशाराही त्यांनी दिला. “सरकार जनतेच्या हितासाठी आहे की महामंडळाच्या ठेकेदारांच्या हितासाठी, हे लोकांना कळायला हवे,” असे टीकात्मक वक्तव्य करत त्यांनी सरकारचा हा निर्णय जनविरोधी असल्याचे म्हटले आहे.
करमाळा प्रतिनिधी "वृत्तलेखन ही एक कला असून ते फक्त माहिती देणे एवढ्यापुरते मर्यादित राहिले नाही,…
करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…