Categories: करमाळा

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने शाळेला नेहमी सहकार्य राहील – डॉ. शिवानी जाधव-पाटील

करमाळा प्रतिनिधी आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने श्री जगदंबा कमलाभवानी मुकबधीर निवासी विद्यालयाला नेहमी सहकार्य मिळत राहील, असे प्रतिपादन संस्थेच्या सचिव डॉ. शिवानी जाधव-पाटील यांनी केले.
यावेळी संस्थेच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात जागतिक महिला दिन तसेच विद्यार्थ्यांसोबत रंगपंचमी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शिवानी जाधव-पाटील होत्या, तर संस्थेचे संचालक तात्यासाहेब जाधव गुरूजी प्रमुख उपस्थित होते. महिला दिनाच्या औचित्याने महिलांच्या कार्याचा गौरव करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आनंद, उत्साह आणि एकात्मतेची भावना वाढविण्यासाठी रंगपंचमी उत्सव साजरा केला गेला. विद्यार्थ्यांनी एकमेकांवर रंग उधळत उत्साह व्यक्त केला.
डॉ. शिवानी जाधव-पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले, “मुकबधीर विद्यार्थ्यांसाठी कार्य करणाऱ्या या विद्यालयाचे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. अशा शाळांना समाजातील सर्व स्तरातून सहकार्य मिळणे गरजेचे आहे. आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने या शाळेला पुढेही नेहमी सहकार्य राहील.”
कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय काळे सर, गणेश सातपुते सर, शंकर येलाले सर, रोहन भालेराव सर, कांबळे मॅडम, वाघ मॅडम, पटणे सर, आप्पा मेहेर, तानाजी कुंभार सर, ज्ञानेश्वर खंदाडे सर, दामोदर परबत आणि संभाजी चौगुले सर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान महिला सन्मान, विद्यार्थ्यांशी संवाद आणि रंगपंचमीचा आनंद अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला आणि विद्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या कार्याचे कौतुक करत असे म्हटले की अशा सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

1 day ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

3 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

4 days ago