या चर्चेदरम्यान पीठासीन अधिकारी म्हणून बोलताना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले. आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेचा लाभ अनेक पात्र पत्रकारांना मिळत नसल्याचे त्यांनी नमूद केले. अनेक पत्रकारांनी ज्या वर्तमानपत्रांमध्ये दीर्घकाळ काम केले ती वर्तमानपत्रे बंद पडलेली असतात किंवा संबंधित संपादकांकडून आवश्यक प्रमाणपत्र मिळविणे कठीण ठरते. त्यामुळे अनेक पात्र पत्रकार योजनांपासून वंचित राहत असल्याची अनेक उदाहरणे त्यांच्या निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, अशा प्रकरणांमध्ये सत्यता पडताळण्यासाठी आणि पात्र पत्रकारांना न्याय देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी स्वतंत्र व सक्षम यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे. अनेक ज्येष्ठ पत्रकार आजारी असूनही योजनांचा लाभ मिळविण्यासाठी प्रयत्न करत असतात; मात्र प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच जिल्हा स्तरावर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला (डीजीआयपीआर) अधिक अधिकार देऊन कायमस्वरूपी व सक्षम यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री कार्यालयाकडे संबंधित खाते असले तरी या विषयाकडे संबंधित मंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सूचित केले.
यावर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सभागृहात सकारात्मक प्रतिसाद देत या सूचनांचा गांभीर्याने विचार करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
दरम्यान, पत्रकारांच्या प्रश्नांवर विधानपरिषदेत आवाज उठवल्याबद्दल डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी आ. श्रीकांत भारतीय यांचे आभार मानले. पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी सभागृहात ठामपणे भूमिका मांडत शासनाचे लक्ष वेधल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
करमाळा प्रतिनिधी "वृत्तलेखन ही एक कला असून ते फक्त माहिती देणे एवढ्यापुरते मर्यादित राहिले नाही,…
करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…