सोमवार, दि. ९ मार्च २०२६ रोजी श्री. ज्ञानेश्वर वाचन मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्षा सौ. मोहिनी संजय सावंत आणि उपाध्यक्ष तथा शिक्षण व ग्रंथालय सभापती अतुल फंड यांच्या हस्ते नवीन ४४ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच यापूर्वी मंजूर झालेल्या ९० घरकुलांसाठी आलेल्या ९० लाख रुपयांच्या निधीपैकी पहिल्या टप्प्यात ५० लाभार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपये याप्रमाणे एकूण ५० लाख रुपयांच्या निधीचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
मुख्याधिकारी सचिन तपसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास बांधकाम सभापती लता घोलप, पाणीपुरवठा सभापती विक्रमसिंह परदेशी, आरोग्य सभापती पूजा इंदलकर तसेच महिला व बालकल्याण सभापती निर्मला गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नगरसेवक संजय सावंत, रवी जाधव, प्रशांत ढाळे, युवराज चिवटे, दिपक चव्हाण, सचिन घोलप, संदीप कांबळे, सिद्धेश लावंड, सुनील बनसुडे तसेच नगरसेविका जबीन मुलाणी, ज्योत्सना लुणिया, स्वाती फंड, साजेदा कुरेशी, सुवर्णा आलाट, अश्विनी अब्दुले, सुनिता ढाणे, चैताली सावंत यांच्यासह रामभाऊ ढाणे, महादेव फंड, सचिन गायकवाड, विजय घोलप आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान नगराध्यक्षा मोहिनी सावंत, उपाध्यक्ष अतुल फंड तसेच मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी लाभार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ज्या लाभार्थ्यांना नवीन घरकुल मंजूर झाले आहे त्यांनी तातडीने नगरपरिषदेकडून बांधकाम परवाना प्राप्त करून प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात करावी. तसेच ज्यांना पहिल्या हप्त्याचा धनादेश मिळाला आहे त्यांनी नियोजित वेळेत बांधकाम पूर्ण करावे, जेणेकरून पुढील हप्ते मिळण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.
या कार्यक्रमाला घरकुल योजनेचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरपरिषदेच्या पुढाकारामुळे शहरातील अनेक गरजू कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होण्यास मोठी मदत होत असल्याची भावना यावेळी लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
करमाळा प्रतिनिधी "वृत्तलेखन ही एक कला असून ते फक्त माहिती देणे एवढ्यापुरते मर्यादित राहिले नाही,…
करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…