Categories: करमाळा

अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेच्या वतीने पत्रकारांच्या कल्याणासाठी शासनमान्यता संरक्षणासाठी कटिबद्ध – केंद्रीय अध्यक्ष राजा माने

करमाळा प्रतिनिधी: अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांना शासनमान्यता मिळवून देणे, त्यांच्या कुटुंबीयांचे संरक्षण आणि सर्वांगीण कल्याण करण्यासाठी अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष राजा माने यांनी केले.  शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे आयोजित जिल्हा कार्यकारिणी बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमात करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेच्या वतीने राजा माने साहेब यांचा सत्कार करण्यात आला.
या बैठकीस संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण नागणे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रशांत कटारे सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी, करमाळा तालुका अध्यक्ष दिनेश मडके, उपाध्यक्ष सूर्यकांत होनप यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना राजा माने म्हणाले की, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून संघटना डिजिटल माध्यमातून काम करणाऱ्या पत्रकारांच्या हक्कांसाठी सातत्याने कार्यरत आहे. डिजिटल आणि प्रिंट मीडिया हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, दोन्ही माध्यमातील पत्रकारांच्या समस्या सोडवणे, त्यांना आवश्यक संरक्षण मिळवून देणे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी काम करणे ही संघटनेची प्रमुख भूमिका आहे.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या पालकत्वाखाली प्रतिबिंब प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली असून, या प्रतिष्ठानच्या माध्यमातून पत्रकारांना वैद्यकीय मदत, मुलांचे शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, तसेच विविध कल्याणकारी उपक्रम राबविले जात आहेत.
राजा माने यांनी सांगितले की, पत्रकारांना दहा लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय विमा मिळावा यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. तसेच डिजिटल माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांना वृत्तपत्रांप्रमाणे स्वतंत्र जाहिरात धोरण आणि शासकीय मान्यता मिळावी, यासाठीही संघटना प्रयत्नशील आह
संघटनेची व्याप्ती आता अखिल भारतीय स्तरावर वाढवली असून सध्या पाच राज्यांमध्ये संघटनेचे काम सुरू आहे. लवकरच संपूर्ण देशभर संघटनेचा विस्तार होणार असून राज्य व केंद्र सरकारकडेही संघटना पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत राहणार आहे.
मार्च महिन्यात संघटनेचा वर्धापन दिन साजरा होणार असून, एप्रिल महिन्यात गोवा येथे राष्ट्रीय महाअधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे.
सोलापूर शहराची नूतन कार्यकारणी जाहीर
याच बैठकीत डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सोलापूर शहरातील नूतन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी अध्यक्षपदी विकास कस्तुरे, कार्याध्यक्षपदी सचिन जाधव, उपाध्यक्षपदी विक्रम इंगळे, सचिवपदी शिवाजी सावंत, सरचिटणीसपदी रवींद्र जोगीपेठकर यांची निवड जाहीर केली आहे.
पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी प्रशांत कटारे (उपाध्यक्ष) आणि परशुराम कोकणे (संघटक) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
खजिनदार चंदन बोल्लू, प्रसिद्धीप्रमुख अकबर बागवान, संघटक शहानवाज शेख आणि कार्यकारणी सदस्यांमध्ये आप्पा बनसोडे, जहूर सय्यद, अनिल कांबळे, अर्जुन चव्हाण, साकिब शेख, प्रसाद ठक्का, योगेश कल्याणकर, बालाजी चिटमिल, दयानंद मामड्याल, इकबाल शेख, आबादी राजे यांचा समावेश आहे.राजा माने यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन शुभेच्छा दिल्या आणि संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

1 day ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago