–
श्री. नीळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या सीना-कोळेगाव धरणाचा पाणी साठा पाटबंधारे विभाग क्र. १, धाराशिव या विभागीय कार्यालयाकडे आहे. मात्र हे कार्यालय परांडा येथून सुमारे ८० किलोमीटर अंतरावर असल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ घेण्यासाठी तसेच विविध प्रकारच्या परवानग्या मिळविण्यासाठी धाराशिव येथे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून वेळ व आर्थिक खर्चही वाढत आहे.
यामुळे सीना-कोळेगाव धरणाचा पाणी साठा सीना-कोळेगाव प्रकल्प विभाग, परांडा यांच्या ताब्यात देण्यात यावा आणि हे विभागीय कार्यालय कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन धरणग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे.
दरम्यान, या मागणीची दखल न घेतल्यास परांडा व करमाळा तालुक्यातील सर्व धरणग्रस्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही सतीश नीळ यांनी दिला आहे.
करमाळा प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून करमाळा नगर परिषद आणि अखिल भारतीय ग्राहक…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील भटके विमुक्त जाती व आदिवासी ज्ञानपीठ संचलित एकलव्य प्राथमिक आश्रमशाळेचे वार्षिक…
करमाळा प्रतिनिधी : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क (RTE) कायद्यानुसार इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत…
करमाळा प्रतिनिधी : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाच्या वीट गणातून मताधिक्याने निवडून…
करमाळा प्रतिनिधी: जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा मानून सर्वसामान्य जनतेची निरपेक्षपणे सेवा केल्यामुळे गणेशभाऊ चिवटे यांना…