Categories: करमाळा

करमाळा तालुक्यात मोबाईल बाऊसरमधून अवैध डिझेल विक्री? करमाळा पेट्रोल पंप असोसिएशनचे कारवाईसाठी निवेदन

करमाळा प्रतिनिधी : करमाळा तालुक्यातील कोर्टी परिसरात मोबाईल बाऊसरच्या माध्यमातून डिझेलची अवैध किरकोळ विक्री होत असल्याचा गंभीर आरोप करमाळा तालुका पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनने केला आहे. या प्रकरणी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करत असोसिएशनने प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे. करमाळा पेट्रोल पंप असोसिएशनचे अध्यक्ष निखिल चांदगुडे सचिव – योगेश गानबोटे
उपाध्यक्ष – सुदर्शन तळेकर पेट्रोल पंप डीलर असोसिएशन करमाळा सदस्य -आशुतोष उर्फ रिंकू घुमरे, रामदास झोळ सर, प्रीतम राठोड, पंकज क्षीरसागर, सुरज दोषी,राजोपाध्याय, मधुकर मारकड,शिवराज रोकडे, बंडू काळे, निलेश सपकाळ,सर्व पदाधिकारी यांनी निवेदन देऊन प्रशासनाने या प्रकरणात कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

असोसिएशनच्या निवेदनानुसार कोर्टी परिसरात फिरवून त्यामध्ये बसवलेल्या खाजगी बाऊसरमधून उघडपणे डिझेल विक्री केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही गाडी तालुक्यातील विविध गावांमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी फिरत दुचाकी, चारचाकी वाहनांमध्ये तसेच प्लास्टिकच्या कॅनमध्ये (जेरिकॅन) डिझेल भरून देत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारात कोणतेही सुरक्षा नियम पाळले जात नसल्याने मोठा धोका निर्माण होत असल्याचे पेट्रोल पंप चालकांचे म्हणणे आहे. पेट्रोलियम सुरक्षेशी संबंधित नियमांचे उल्लंघन करून ही विक्री केली जात असल्याचा आरोपही असोसिएशनने केला आहे.
असोसिएशनच्या माहितीनुसार, पेट्रोलियम अँड एक्स्प्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन (PESO) ने २५ मार्च २०२२ रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार बाऊसरमधून प्लास्टिक कॅनमध्ये किंवा थेट वाहनांमध्ये इंधन देण्यास मनाई आहे. तसेच अधिकृत बाऊसरला केवळ निश्चित ‘जिओ-फेन्स्ड’ ठिकाणीच इंधन भरण्याची परवानगी असते. मात्र कोर्टी परिसरात खाजगी आणि बेकायदेशीर बाऊसरद्वारे सर्रास नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय मोटार स्पिरिट आणि हाय-स्पीड डिझेल आदेश २००५ अंतर्गत पेट्रोल पंपाच्या अधिकृत जागेबाहेर अशा प्रकारे फिरती विक्री करणे हा दखलपात्र गैरप्रकार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या कलम ३ व ७ नुसार परवाना नसलेल्या ठिकाणी डिझेलची विक्री किंवा वाहतूक करणे हा फौजदारी गुन्हा ठरू शकतो. कलम ६-अ अंतर्गत संबंधित वाहन जप्त करण्याची तरतूदही असल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले आहे.
या बेकायदेशीर प्रकारामुळे कोणत्याही क्षणी आग किंवा स्फोट होऊन मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर अधिकृत परवानाधारक पेट्रोल पंप चालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचेही असोसिएशनने म्हटले आहे.
दरम्यान हे निवेदन पोलीस उपविभागीय अधिकारीअंजना, कृष्णा पोलीस निरीक्षक रणजीत माने तसेच तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांना देण्यात आले आहे.
महसूल व पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी छापा टाकून संबंधित मोबाईल बाऊसर व त्यातील डिझेल साठा जप्त करावा. तसेच वाहन मालक आणि संबंधित व्यक्तींवर करमाळा पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी ठाम मागणी पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनने केली आहे.
या निवेदनासोबत संबंधित प्रकाराचे फोटो व व्हिडिओ पुरावे तसेच असोसिएशनच्या सदस्यांच्या सह्यांची यादी जोडण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

3 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago