निंभोरे, ता. करमाळा : निंभोरे गावातील तसेच करमाळा तालुक्यातील स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शनिवारी (दि. 14 मार्च) उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करमाळा तालुक्याच्या तहसीलदार शिल्पाताई ठोकडे होत्या, तर गटविकास अधिकारी मनोज राऊत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही निंभोरे ग्रामस्थांनी तालुक्यातील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी निंभोरे गावचे सुपुत्र रणजित गोरख वळेकर यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच पल्लवी डाकवले/मारकड यांची सहाय्यक राज्यकर आयुक्त पदावर निवड झाली असून अक्षय वाघमारे यांची न्यायालयात लिपिक पदावर निवड झाली आहे.
याशिवाय कीर्ती साळुंखे हिची कर सहाय्यक पदावर निवड झाली असून स्वप्नील वळेकर यांची जलसंधारण विभागात वर्ग-२ पदावर निवड झाली आहे. तसेच केम गावचे सुपुत्र सचिन जाधव आणि पांगरे गावचे सुपुत्र प्रविण पवार यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये मिळवलेले यश हे इतर तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. कठोर परिश्रम, सातत्य आणि योग्य मार्गदर्शन यामुळेच अशा यशाची प्राप्ती होते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
हा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंभोरे, श्री छत्रपती संभाजी विद्यालय निंभोरे तसेच समस्त ग्रामस्थ निंभोरे यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा निंभोरे येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…