Categories: करमाळा

मांजरगावच्या महेशकुमार कुलकर्णी यांना मानद डॉक्टरेट प्रदान

करमाळा प्रतिनिधी 
करमाळा तालुक्यातील मांजरगाव येथील सुप्रसिद्ध वास्तुशास्त्रतज्ञ, अंकशास्त्र विशारद व ज्योतिष मार्गदर्शक महेशकुमार सुमंत कुलकर्णी यांना दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य समारंभात मानद डॉक्टरेट (Honorary Doctorate) पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
दिल्ली येथे दि. १४ मार्च २०२६ रोजी ‘द कॅसल ऑफ आर्ट थिएटर’ येथे झालेल्या प्रतिष्ठित समारंभात Magic Book of Record & Art University, Delhi यांच्या वतीने हा सन्मान देण्यात आला. समाजामध्ये वास्तुशास्त्र, ज्योतिष, अंकशास्त्र तसेच आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या माध्यमातून अनेकांना योग्य दिशा देण्याचे कार्य कुलकर्णी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने केले आहे. त्यांच्या या समाजोपयोगी कार्याची दखल घेत विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली.
Magic Book of Record चे चेअरमन व आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती प्राप्त व्यक्तिमत्त्व डॉ. सी. पी. यादव यांच्या हस्ते कुलकर्णी यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. तसेच सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील व अनेक राज्यांचे ॲटर्नी जनरल म्हणून कार्य केलेले डॉ. राम अवतार शर्मा यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली.
या समारंभास आंतरराष्ट्रीय मोटिवेशनल स्पीकर मिस पूजा वत्स, गुजरात येथील मिस नॅन्सी मिश्रा यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी कुलकर्णी यांच्या कार्याचे विशेष कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना डॉ. महेशकुमार सुमंत कुलकर्णी म्हणाले, “हा सन्मान माझ्यावर विश्वास ठेवणारे सर्व यजमान, हितचिंतक मित्रपरिवार, नातेवाईक तसेच माझ्या गावातील सर्व ग्रामस्थ यांना समर्पित आहे. त्यांच्या विश्वास, प्रेम आणि पाठिंब्यामुळेच मला हे कार्य करता आले.”
दिल्ली येथे प्राप्त झालेल्या या मानद डॉक्टरेट सन्मानामुळे मांजरगाव व करमाळा तालुक्याच्या नावाला एका वेगळ्या क्षेत्रामध्ये गौरव प्राप्त झाला असून विविध स्तरांतून डॉ. महेशकुमार सुमंत कुलकर्णी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे अनेकांना प्रेरणा मिळत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

8 hours ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

11 hours ago

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

1 day ago