Categories: करमाळा

बायोगॅस प्रकल्प शेतकऱ्यांसाठी काळाची गरज… योजनेचा लाभ घेण्याचे सुजित तात्या बागल यांचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी
सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये संपूर्ण देशभरामध्ये पेट्रोल, डिझेल या इंधनटंचाईसह एलपीजी गॅसची टंचाई जाणवू लागलेली आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही त्याच्या झळा आता बसू लागलेल्या आहेत. यावरती बायोगॅस हा शेतकऱ्यांसाठी एक शाश्वत पर्याय उपलब्ध आहे. Iresoil अग्रोटेक या कंपनीच्या सहकार्यातून व शिवकस्तुर फार्मर प्रोडूसर कंपनीच्या माध्यमातून करमाळा तालुक्यांमध्ये बायोगॅस प्रकल्प युनिट उभा करण्याचे काम सध्या सुरू असून ज्या शेतकऱ्यांना याचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहन शिवकस्तुर फार्मर प्रोडूसर कंपनी अध्यक्ष सुजित तात्या बागल यांनी केले आहे.
या प्रकल्पाविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की,बायोगॅस व जैविक खत, औषध निर्मितीच्या या प्रकल्पाचे मूल्य ५६०००/- रूपये आहे. युनिट उभा करत असतानाच CSR फंडामधून २४०००/- रूपये अनुदान वजा करून उर्वरित ३२०००/- रूपये रक्कम शेतकऱ्यांनी भरणे अपेक्षित आहे.ही रक्कम भरल्यानंतर व युनिट चालू झाल्यानंतर शासनाकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर १६०००/- अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होते म्हणजे शेतकऱ्यांना हे युनिट फक्त १६०००/- रुपयांमध्येच मिळते.
या बायोगॅस युनिट मधून दिवसाला ९०० ग्रॅम गॅस तयार होतो. हा गॅस १० माणसाच्या कुटुंबाला दिवसभराचा स्वयंपाक बनवूनही शिल्लक राहतो.या युनिट मधून जी स्लरी बाहेर पडते त्याचे लिक्विड आणि पावडर फॉर्ममध्ये आपल्याला खत तयार करता येते.स्लरी गाळून खाली जाते ते पाणी आपल्याला बॅरल मध्ये साठवून ती ठिबक मधून सोडण्यासाठी उपयोगी पडते म्हणजेच हा फक्त बायोगॅस प्रकल्प नाही तर या माध्यमातून वेगाने तयार होणारे उपयुक्त असे शेणखत ही आपल्याला मिळते. आणि स्लरीही औषध म्हणून आपल्याला पिकांना ठिबक मधून सोडण्यासाठी किंवा फवारणीसाठी ही वापरता येते . हा बायोगॅस व जैविक खत प्रकल्प घरोघरी बसवणे शेतकरी हिताचे आहे. हा प्रकल्प उभा करण्यासाठी सस्टेन प्लस एनर्जी फाउंडेशन चे संजय पिरंगुटे, Iresoil अग्रोटेक चे अमर पाटील, दीपक गवळी यांचे सहकार्य लाभत असल्याचे बागल यांनी सांगितले.

saptahikpawanputra

Recent Posts

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

5 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

1 week ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

1 week ago