Categories: करमाळा

करमाळ्यात शिवकन्या अकॅडमीच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त आरोग्य गुढी आणि स्नेहमेळावा उत्साहात संपन्न


करमाळा प्रतिनिधी- गेल्या १० वर्षांपासून महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी कार्यरत असलेल्या शिवकन्या अकॅडमी चा १० वा वर्धापनदिन आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून करमाळा येथे एका भव्य स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अकॅडमीच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात शिवकन्या अकॅडमीच्या नवीन फलकाच्या अनावरणाने झाली. हे अनावरण करमाळ्याच्या नगराध्यक्षा मा. मोहिनी संजय सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका चैताली सावंत, प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ. कविता कांबळे, अस्थिरोग तज्ञ डॉ. अपर्णा भोसले आणि श्रद्धा तपसे यांची उपस्थिती होती.
भारतीय संस्कृती आणि आरोग्याचा वारसा जपत अकॅडमीच्या सदस्य महिलांनी ‘आरोग्याची गुढी’ उभारून एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे महिलांनी सादर केलेली नाटिका. मुलीच्या जन्मापासून ते वयोवृद्ध होईपर्यंतचा तिचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास या नाटिकेच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला, ज्यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले.
अकॅडमीच्या संस्थापक अध्यक्षा प्रियांका गायकवाड यांनी उपस्थित महिलांना संबोधित करताना ‘माईंड ट्रान्सफॉर्मेशन’ (मानसिक परिवर्तन) या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. “केवळ शारीरिकदृष्ट्या सुदृढ होण्यापेक्षा मानसिकदृष्ट्या खंबीर होणे ही काळाची गरज आहे,” असे त्यांनी नमूद केले.
१० वर्षांनंतर पुन्हा एकदा जुन्या मैत्रीला उजाळा देऊन महिलांना एकत्र आणण्याचे काम या निमित्ताने झाले.
एका छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर व्हावे, त्याप्रमाणे घरापासून सुरू झालेली ही अकॅडमी आज शेकडो महिलांचे आधारस्तंभ बनली आहे. या मेळाव्यात महिलांनी आपले सुख-दुःख व्यक्त करत मैत्रीचे ऋणानुबंध जपले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवकन्या अकॅडमीच्या सर्व महिला सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
शिवकन्या अकॅडमीच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून, करमाळ्यातील महिलांच्या संघटन शक्तीचे हे एक उत्तम उदाहरण ठरले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

20 hours ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago