Categories: करमाळा

सभापतीपदाच्या संधीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवा -माजी आमदार जयवंतराव जगताप : –

करमाळा प्रतिनिधी पंचायत समितीच्या सभापती पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य दिनदलित उपेक्षित समाजाचे प्रश्न सोडवा,शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजवंत लाभार्थ्यांना द्याअशा प्रकारच्या सूचना माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी पंचायत समितीच्या नूतन सभापती सौ पूजाताई ढेरे यांना दिल्या .पंचायत समितीचे सभापती पदी बिनविरोध निवड झाल्यानंतर सौ .पुजाताई ढेरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत माजी आमदार जयवंतराव जगताप यांची त्यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले .याप्रसंगी शुभेच्छा देताना श्री जगताप बोलत होते पुढे बोलताना जगताप यांनी सांगितले की तुम्हाला अल्पवयात पंचायत समितीच्या सभापती पदाची संधी मिळालेली आहे यातून तुम्ही तुमचे कर्तृत्व सिद्ध करून तुमच्या कामाच्या माध्यमातून पुढील पिढीला आदर्श ठरावा असे कामकाज करा असे आवाहन केले .स्व यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात पंचायत राज व्यवस्थेची निर्मिती केल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेच्या पहिल्या अध्यक्ष पदाचा मान देशभक्त नामदेवराव जगताप यांना मिळाला होता . त्यांनीत्यांचा कामाचा ठसा असा उमटवला होता की आजही त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीचा उल्लेख फक्त सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आवर्जून केला जातो .याच माध्यमातून त्यांनी जिल्हाभरात कार्यकर्त्यांचे जाळे विणले होते .याचा देखील आवर्जून उल्लेख यावेळी जगताप यांनी केला .

saptahikpawanputra

Recent Posts

गोमातेच्या पूजनातून गोसेवेचा संदेश; गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्थेत वसुबारस उत्साहात साजरी

करमाळा  प्रतिनिधी भारतीय संस्कृतीत गोमातेला अत्यंत पवित्र आणि पूजनीय स्थान असून, गोसेवा ही श्रद्धा, संस्कार…

2 days ago

यशवंत शिंदे यांची नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी! ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकमाढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी  निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…

4 days ago

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

4 days ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

5 days ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

1 week ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

2 weeks ago