Categories: करमाळा

करमाळा शहरात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘आनंदी ज्वेलर्स’ची आकर्षक ऑफर; घडनावळीवर मोठी सूट

करमाळा प्रतिनिधी : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर जाहीर करत करमाळा येथील ‘आनंदी ज्वेलर्स डायमंड’ने सणासुदीच्या खरेदीला नवी झळाळी दिली आहे. १२ मार्च ते २० मार्च या कालावधीत ही विशेष योजना राबविण्यात येत असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.
या ऑफरअंतर्गत सोन्याच्या दागिन्यांच्या घडनावळीवर (मेकिंग चार्जेस) तब्बल ४० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. तसेच हिऱ्याच्या दागिन्यांवर घडनावळी पूर्णपणे माफ (१०० टक्के सूट) करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना दर्जेदार दागिने खरेदी करताना मोठी बचत होणार आहे.
गुढीपाडवा हा सण खरेदीसाठी शुभ मानला जात असल्याने ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर ‘आनंदी ज्वेलर्स’ने ही विशेष ऑफर आणली असून, ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, ‘आनंदी ज्वेल्स’ लवकरच आपल्या सेवेत दाखल होणार असून, ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा आणि आकर्षक डिझाइन्स उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचेही सांगण्यात आले.
‘आनंदी ज्वेलर्स डायमंड’ हे करमाळा येथील मेनरोडवर स्थित असून अधिक माहितीसाठी (०२१८२) २२२२०९ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

22 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago