Categories: करमाळा

दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये ‘TIMES-2026’ आंतरराष्ट्रीय परिषद दिमाखात संपन्न

करमाळा प्रतिनिधी स्वामी-चिंचोली (ता. दौंड) : दत्तकला शिक्षण संस्था संचलित दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स येथे “ट्रेंड्स इन मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग स्ट्रीम्स (TIMES-2026)” या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद दि. १३ व १४ मार्च रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. संशोधन, नवोपक्रम आणि तांत्रिक प्रगतीचा संगम साधणारी ही परिषद देश-विदेशातील तज्ज्ञ, संशोधक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गाजली.
ही परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच फिलिपाईन्समधील युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्या सहकार्याने हायब्रिड पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. भारतासह फिलिपाईन्स, इंडोनेशिया आणि तैवान येथील संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
उद्घाटन प्रसंगी जीएलए विद्यापीठ, मथुरा येथील प्र-कुलगुरू डॉ. दुर्गसिंह एस. चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विश्वगुरू इन्फोटेक प्रा. लि.चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र व्ही. गंगार्डे तसेच वॅनिक्स टेक्नॉलॉजीज प्रा. लि.चे सीईओ डॉ. आर. अश्वनी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
परिषदेची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. संयोजक डॉ. एस. एस. बेरे यांनी स्वागतपर भाषणात परिषदेची उद्दिष्टे स्पष्ट केली. संचालक प्रा. श्रीकांत साळुंके यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेचे महत्त्व अधोरेखित करत संशोधन व शैक्षणिक सहकार्य वाढविण्याची गरज व्यक्त केली.
प्रमुख पाहुणे राजेंद्र गंगार्डे यांनी आपल्या मनोगतात “जिथे समस्या, तिथे अभियंता” हा संदेश देत विद्यार्थ्यांना संशोधन व नवोपक्रमासाठी प्रेरित केले. तर डॉ. दुर्गसिंह चव्हाण यांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर प्रायोगिक ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी संस्थेच्या कार्याचा आढावा मांडला.
परिषदेत आंतरराष्ट्रीय की-नोट वक्त्यांनी विविध अत्याधुनिक विषयांवर मार्गदर्शन केले. डॉ. कॅथलीन एबोरा पॅड्रिगालन यांनी पवनचक्की देखभालीसाठी रोबोटिक्स तंत्रज्ञानावर सादरीकरण केले. डॉ. द्वी सुदार्नो पुत्रा यांनी आधुनिक मोटर प्रणाली आणि स्मार्ट तंत्रज्ञानावर भाष्य केले. दुसऱ्या दिवशी डॉ. मायसेल ए. कॅपिलायन यांनी जैवसंकेत विश्लेषण आणि आरोग्यविषयक संशोधन मांडले, तर डॉ. फिरोज इस्माईल मुलाणी यांनी “नेट झिरो एनर्जी बिल्डिंग” संकल्पनेवर मार्गदर्शन केले.
दोन दिवसीय परिषदेत संशोधन निबंध सादरीकरण, तांत्रिक सत्रे, प्रश्नोत्तर सत्रे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. संशोधन निबंधांचे मूल्यांकन तज्ज्ञ परीक्षकांकडून पारदर्शक पद्धतीने करण्यात आले असून उत्कृष्ट सादरकर्त्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
या परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. एस. एस. काठाळे, डॉ. एस. एस. बेरे व डॉ. एन. पी. देशमुख यांनी संयोजक म्हणून काम पाहिले. सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे परिषद यशस्वीरीत्या पार पडली.
समारोप प्रसंगी सर्व मान्यवर, वक्ते, संशोधक व सहभागी यांचे आभार मानण्यात आले. 

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago