या कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष श्री. लक्ष्मण नेमचंद बुधवंत यांच्या पुढाकारातून करण्यात आले. त्यांच्या मातोश्री श्रीमती. पदमिन नेमचंद बुधवंत यांच्या हस्ते डब्यांचे वितरण करण्यात आले.
गेल्या दहा वर्षांपासून श्री. लक्ष्मण बुधवंत हे विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेत असून, रावगाव व परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप सातत्याने करत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळत असून, त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक व्यक्त केले जात आहे.
कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद स्पष्टपणे जाणवत होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शालेय जीवनात उपयोगी पडणारी मदत मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या वेळी पंचायत समितीच्या नूतन सदस्या सौ. संध्या कांबळे, सरपंच श्री. संदीप शेळके, उपसरपंच श्री. भाऊसाहेब करगळ, मार्केट कमिटी संचालक श्री. दादासाहेब जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. तात्यासाहेब पाटुळे, उपाध्यक्ष श्री. असिफ शेख, ग्रामपंचायत सदस्य श्री. दादासाहेब पवार व ज्ञानेश्वर जाधव, करमाळा तालुका समता परिषद अध्यक्ष श्री. प्रशांत शिंदे तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. अण्णासाहेब भोसले व श्री. राजेश बरडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत श्रीम. रोहिणी चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक श्री. अशोक बरडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…